Friday, May 20, 2022
Home करमणूक "पावसाचं पाणी साचतं तेवढं पाणी विगच्या खाली..."; प्रसादने सांगितला शुटिंग दरम्यानचा मेकअपचा...

“पावसाचं पाणी साचतं तेवढं पाणी विगच्या खाली…”; प्रसादने सांगितला शुटिंग दरम्यानचा मेकअपचा अनुभव | “As much water as rainwater is stored under the wig …” Prasad shared his makeup experience during the shootठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दाखवणारा ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आहे. प्रसाद ओक या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता प्रसाद ओकने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारताना त्यांच्यासारखं दिसण्यासाठी केलेल्या मेकअपबद्दल सांगितलं.

सिनेमात प्रसाद ओकला अशा पद्धतीने मेकअप केला आहे पडद्यावर बघितलं की खरोखर आनंद दिघेच आहेत असं वाटत. या मेकअपमागे खूप मेहनत असल्याचंही तो सांगतो. लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी प्रसादने सांगितलं की, ” शुटिंगच्या दरम्यान मी थोडसं जरी वाकलो तरी हेअर विग सरकायचा. १२ तासांची शिफ्ट १४ तास चालायची, कधी कधी अगदी १६ तास चालायची. विग काढल्यानंतर अक्षरशः पावसाचं पाणी साचतं तसं माझ्या डोक्यावर घाम साचायचा. तो विग जागेवरून हलू नये म्हणून पटकन खाजवताही येत नव्हतं. विग, दाढी याकडे लक्ष देताना आपण नीट काम करतोयना याची चिंता असायची.”

प्रसाद आणि आनंद दिघे यांच्या हास्यामध्ये फरक होता. प्रसाद हसतो तेव्हा त्याचे दात दिसत नाहीत पण आनंद दिघे जेव्हा हसायचे तेव्हा त्यांचे दात दिसायचे. ही बारीकशी गोष्टही हुबेहूब दिसावी म्हणून प्रसादच्या हास्यावर काम करण्यात आलं होत. त्याबद्दल तो सांगतो की, ” हसताना दात दिसण्यासाठी डेंगचर लावलं होत. शुटिंगच्या दरम्यान ते निघू नये म्हणून काळजी घ्याववी लागायची.ते जास्त मोठ असल्यामुळे माझ्या हिरड्या दुखायला लागायच्या आणि त्याचा स्ट्रेस डोक्यावर यायचा. डोक्यावर विग असायचा त्यामुळे अर्ध शुटिंग मी डोके दुखितच केलं आहे.”

Digital Adda : धर्मवीर चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से अन् प्रसाद ओक’ पाहा खालील व्हिडीओमध्ये

१३ मे अर्थात आज सर्वत्र हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पवसच #पण #सचत #तवढ #पण #वगचय #खल #परसदन #सगतल #शटग #दरमयनच #मकअपच #अनभव #water #rainwater #stored #wig #Prasad #shared #makeup #experience #shoot

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखतची सोनेरी मोहोर | World Boxing Championship Nikhat Golden Bloom Indian boxer Gold medal World Boxing Championships ysh 95

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (५२ किलो) इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

आज दिनांक 20 मे 2022, शुक्रवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भाग्यस्थानात असून...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....