आमीर लियाकत यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ते आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. तसंच, त्यांच्याजवळ ड्रग्जही दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर लियाकत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. माझा न्यूड व्हिडिओ लीक करण्यात जे लोकं जबाबदार आहेत तो कोणत्या वृत्तीचे लोकं आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. न्यायपालिका कुठे आहे. न्यायपालिकेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाच्या आत्मसन्मानाची रक्षा करणे आहे. न्यायपालिकेनं अजून कोणतेच ठोस पाऊल का उचलले नाही. सायबर क्राइमनेही अद्याप कोणतीही कारवाई का नाही केली, असा सवाल लियाकत यांनी केला आहे.
लियाकत यांनी त्यांच्या तिसरी पत्नी दानिया शाहवरही गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडिओ लीककरुन दानियाने लग्नासारख्या पवित्र बंधनाला कलंकित केलं आहे. या व्हिडिओत मी दिसत असल्याने लोकं माझी चेष्टा करत आहेत. पण जर या व्हिडिओत एखादी महिला असती तरीदेखील अशीच चेष्टा केली असती का, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः पंतप्रधान मोदी श्रीनगरला का जात नाहीत?; काश्मीरी पंडिताच्या हत्येवर भाजप नेत्याचा सवाल
दानियाने सर्व मर्यांदा तोडल्या आहेत. तसंच, लग्नासारख्या पवित्र बंधनावरील विश्वासही तिने तोडला आहे. पती- पत्नी हे एका नात्यात बांधलेले असतात मात्र दानियाने हे नातं विश्वासघाताने तोडून टाकलं आहे, असंही लियाकत यांनी म्हटलं आहे.लियाकत यांनी दानियाने इंटरव्ह्यू दिलेल्या मीडिया पोर्टललाही सुनावले आहे. मॉर्फिग हा एक लोकप्रिया प्रकार आहे. ज्याचा वापर करुन एक अजेंडा तयार करु शकतो, असं म्हणत त्यांनी न्यूड व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
वाचाः कॉंग्रेसमध्ये एका कुटुंबात एकच तिकीट देण्याचा विचार, अर्थात अपवाद असणार!
व्हिडिओ लीक करण्याच्या आरोपांवर दानियाने एका मुलाखतीत दानियाने स्पष्टीकरण दिलं आहे. कोणीतरी मला हा व्हिडिओ शेअर केला आहे. मी त्यांच्यावर कोणतेही आरोप केले नाहीत. मला फक्त त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट द्यावा, असं दानियाने म्हटलं आहे. दरम्यान, दानिया ही आमिर लियाकत यांची तिसरी पत्नी आहे. न्यूड व्हिडिओ लीक होण्याच्याआधी दानियाने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला होता. तसंच, लियाकतवर गंभीर आरोपही केले होते.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#पक #खसदरच #नयड #वहडओ #लक #तसऱय #पतनवर #कल #गभर #आरप