Saturday, July 2, 2022
Home भारत पाकिस्तान, सौदी, थायलंडमध्येही एकनाथ शिंदेंच्या चर्चा! गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर 

पाकिस्तान, सौदी, थायलंडमध्येही एकनाथ शिंदेंच्या चर्चा! गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर 


Eknath Shinde Top Search : एकनाथ शिंदेच्या बंडामुळे देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असतानाच आता पाकिस्तानमध्येही शिंदेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकाराणाला हदरवून सोडणारे एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत याची उत्सुकता पाकच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानी नागरिक एकनाथ शिंदेंबाबत गुगलवरुन माहिती शोधण्याचा प्रयत्न करातायेत. पाकिस्तानातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी एकनाथ शिंदेंविषयी माहिती सर्च केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांना मागे टाकत एकनाथ शिंदे गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर आले आहेत. पाकिस्तानसोबतच सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान आणि कॅनडातही एकनाथ शिंदेंच्या नावाने गुगल सर्च केलं जात असल्याचं कळत आहे.

महाराष्ट्रातील राजकीय गरमागरमीची चर्चा ही केवळ राज्यात देशातच नाही तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.  33 देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्वाधिक सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे हाते. शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानात 54 टक्के, सौदी अरेबियात 57 टक्के, मलेशिया 61 टक्के, नेपाळ 51 टक्के, बांगलादेश 42 टक्के, थायलंड 54 टक्के, जपान 59 टक्के, कॅनडात 55 टक्के लोकांनी सर्च केले

दरम्यान भारतात एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे? याबाबत देखील खूप जास्त प्रमाणात सर्च केलं जात आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे.   

भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?

भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याची अट उद्धव ठाकरेंसमोर ठेवली होती. या बंडानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 37 आमदारांसह एकूण 46 आमदार असल्याचं बोललं जात आहे. तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील नेते सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पकसतन #सद #थयलडमधयह #एकनथ #शदचय #चरच #गगलचय #टरड #सरचमधय #टपवर

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

Smartphone Offers: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ, Samsung Galaxy S21 FE 5G वर मिळतोय ३७ हजारांपर्यंत ऑफ

नवी दिल्ली:Samsung Galaxy S21 FE 5G Price: प्रीमियम सेगमेंटचा स्मार्टफोन खरेदी करायची प्रत्येक युजरची इच्छा असते. पण, जास्त किमतींमुळे, असे हँडसेट बर्‍याच युजर्ससाठी...

Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक

<p>Goregaon Aarey Colony : आरे कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त, कारशेडविरोधात उद्या आंदोलनाची हाक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

तीव्र डोकेदुखी, अशक्तपणाकडे दुर्लक्ष नको; मेंदुचा हा गंभीर आजार झालेला असू शकतो

मुंबई, 02 जुलै : अनेकजण डोकेदुखीचा त्रास होत असताना डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतात. अशा स्थितीत दुखण्यात काही काळ आराम मिळतो. पण,...

Flipkart वर सुरूये खास सेल, अवघ्या ७९ रुपयात मिळेल वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध

नवी दिल्ली :Flipkart Big Bachat Dhamaal Sale: Flipkart वर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. १ जुलैपासून सुरू झालेला हा सेल ३ जुलैपर्यंत...

फोनला ठेवा बॅक्टेरिया फ्री, आजार राहतील दूर; ‘या’ टिप्स येतील कामी

How to Clean Your Phone: करोना व्हायरस महामारीनंतर लोक स्वच्छतेबाबत अधिक जागृक झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आता विशेष काळजी घेतली जाते. व्हायरस, जंतूपासून...