Friday, August 12, 2022
Home विश्व पाकिस्तान डबघाईला! पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान भाड्यावर देणार

पाकिस्तान डबघाईला! पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान भाड्यावर देणार


इस्लामाबाद: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तान सरकारकडून निधी उभारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान आता भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने पंतप्रधानांच्या घराचे रुपांतर विद्यापीठात करण्याची घोषणा केली होती.

या घोषणेनंतर इम्रान खान यांनी निवासस्थान सोडले होते. आता सरकारने आपली भूमिका बदलली आहे. समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, संघीय सरकारने पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे रुपांतर विद्यापीठात करण्याचा निर्णय बदलला आहे. त्याऐवजी हे निवासस्थान भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. त्यातून महसूल मिळवण्यात येणार आहे. कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयानुसार, हे निवासस्थान शैक्षणिक संस्थेला देण्याऐवजी सांस्कृतिक, फॅशन आणि अन्य कार्यक्रमांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार आहे.

वाचा:हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानचे भारताला साकडं; केली ‘ही’ मागणी!

पाकिस्तानमधील समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने यासाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. पंतप्रधान निवासस्थानात नियमांचे उल्लंघन होता कामा नये याकडे ही समिती लक्ष ठेवणार आहे. पंतप्रधान निवासस्थानाच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. पंतप्रधान निवासस्थानातील सभागृह, दोन गेस्ट विंग्स आणि एक लॉन भाडेतत्वावर देऊन महसूल मिळवला जाऊ शकतो. त्याशिवाय उच्चस्तरीय राजनयिक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात येईल.

इम्रान खान म्हणतात, तालिबानमध्ये सामान्य नागरीक!
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर इम्रान खान यांनी काटकसरीचे धोरण अवलंबले होते. लोककल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी निधीचा तुटवडा असल्याने त्यांनी अनेक खर्चांमध्ये कपात केली होती. इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानची अर्थव्यवस्था १९ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पकसतन #डबघईल #पतपरधनच #शसकय #नवससथन #भडयवर #दणर

RELATED ARTICLES

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

Most Popular

सेफ रिलेशनबाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्राच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा असो किंवा लैंगिक आजार असो हे टाळण्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंधांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. याच सेफ...

Pune Mumbai Railway Stranded Landslide : पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

<p>मुंबई, पुण्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी... खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर...

Shocking News ! देशातून Dominos pizza हद्दपार

या कंपनीवर गाशा गुंडाळण्याची वेळ  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Shocking...

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...