Saturday, November 27, 2021
Home विश्व 'पाकिस्तान, चीनवर विश्वास नाही! अफगाणिस्तानची मदत फक्त पंतप्रधान मोदीच करु शकतात'

‘पाकिस्तान, चीनवर विश्वास नाही! अफगाणिस्तानची मदत फक्त पंतप्रधान मोदीच करु शकतात’


नवी दिल्ली : तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर भारतात राहणारे अफगाणी नागरिक त्यांच्या कुटुंबीयांबद्दल चिंतित आहेत. अफगाणी नागरिक जगभरातून मदतीच्या आशेवर आहेत. विशेषतः या नागरिकांना भारताकडून मोठ्या आशा आहेत. भारतात गेली अनेक वर्ष  वास्तव्यास असणारे अफगाण वंशाचे व्यापारी झहीर खान यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

पाकिस्तान (Pakistan), चीन (China) आणि सौदी अरेबियावर (Saudi Arabia) आमचा जराही विश्वास नाही, भारतावर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून आम्हाला मोठ्या आशा आहेत, असं झहीर खान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला मदत करू शकतात, असं झहीर खान यांचं म्हणणं आहे.

कोलकाताच्या मलिक बाजार इथं झहीर खान व्यवसाय करतात. अफगाणिस्तानची सद्य परिस्थिती पाहून ते खूप दुःखी आहे. अशा अफगाणिस्तानला कधीही स्वीकारणार नाही, जिथे तालिबानचे राज्य आहे असं झहीर खान सांगतात. झहीर खान यांचे वडील सुमारे 25 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून भारतात आले होते आणि तेव्हापासून ते कोलकाता इथं राहत आहेत. कोलकातामध्ये अनेक अफगाणींची घरं आहेत.

त्यांना इथं ‘काबुलीवाला’ अर्थात Men of Kabul म्हणून ओळखलं जातं. हे अफगान नागरिक 1840 च्या आसपास इथं आले होते आणि तेव्हापासून ते कोलकातामध्ये राहत आहेत. चीन आणि पाकिस्तानने तालिबानला पाठिंबा दिला आहे असं झहीर खान यांचं म्हणणं असून अफगाणिस्तानचे लोक फक्त भारतावर विश्वास ठेवतात असंही झहीर खान यांनी म्हटलं आहे.

मलिक बाजारमधील आणखी एक व्यापारी इब्राहिम खान म्हणतात ‘तुम्ही पाकिस्तानबद्दल कोणत्याही अफगाणिणीचे मत विचारता, ते म्हणतील की त्यांना त्या देशाकडून कोणतीही मदत नको आहे. पाकिस्तान आमचे पहिले शत्रू आहेत. 

इब्राहिम यांचं कुटुंब अफगाणिस्तानमध्ये राहतं. पंतप्रधान मोदींनी आमच्या कुटुंबांना तेथून बाहेर काढण्यासाठी आम्हाला मदत करावी. असं आवाहन इब्राहिम खान यांनी केलं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पकसतन #चनवर #वशवस #नह #अफगणसतनच #मदत #फकत #पतपरधन #मदच #कर #शकतत

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

Most Popular

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

ST Bus Strike : कामावर या, अनिल परबांनी निलंबनाबद्दल केली मोठी घोषणा

'मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्यांशी घेणेदेणे नाही. फक्त कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कामगारांनी कोणाच्या मागे भरकटू नये' अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...