Saturday, November 27, 2021
Home क्रीडा पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे काय सुरू आहे? VIDEO पाहून बसणार नाही विश्वास

पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे काय सुरू आहे? VIDEO पाहून बसणार नाही विश्वास


मुंबई, 18 ऑगस्ट : पाकिस्तान क्रिकेटचा  (Pakistan Cricket) दर्जा गेल्या काही वर्षांपासून खालावला आहे.  पाकिस्तान क्रिकेटचा  पाया कमकुवत झाल्यानं टीमची ही अवस्था झाली आहे. ही अवस्था का झाली? याचे कारण सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे.
पाकिस्तानच्या ‘एआरवाय न्यूज’नं त्यांच्या रिपोर्टमध्ये हा धक्कादायक खुलासा केलाय. पंजाब प्रांतामधील खानेवाल स्टेडियमबाबत  (Khanewal Cricket Stadium) त्यांनी खुलासा केलाय. या स्टेडियममध्ये चक्क भोपळा आणि मिर्ची यांची शेती सुरू आहे. या स्टेडियममध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील सामने होणार होते. त्याचवेळी या स्टेडियममधील वास्तव उघड झालं आहे.
हे स्टेडियम बांधण्याठी कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्याच स्टेडियममध्ये शेतकऱ्यांनी चक्क शेती सुरू केली आहे. त्यांनी या स्टेडियमचा ताबा घेतला. जिथं खेळाडू तयार व्हायला पाहिजे आहेत त्या ठिकाणी सध्या भोपळा, मिर्ची आणि भाज्या तयार होत आहेत.

शोएब अख्तर निराश
या रिपोर्टनुसार खानेवाल स्टेडियम जिल्हा प्रशासनाच्या अधिकारात येते. त्यांनी या स्टेडियमसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलाय. पण आता त्याचा भलत्याच कामासाठी वापर होत आहे. स्टेडियमची ही अवस्था पाहून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) निराश झाला आहे.
T20 World Cup : वेळापत्रक जाहीर होताच बाबर आझमनं टीम इंडियाला डिवचलं!
न्यूझीलंड टीम करणार दौरा
पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट टीमवर 2009 साली दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्ण बंद झाले. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी झिम्बाब्वेची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली होती. आता सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडची टीम पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्या दौऱ्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेटची जगात पोलखोल झाली आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पकसतन #करकटमधय #ह #कय #सर #आह #VIDEO #पहन #बसणर #नह #वशवस

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Most Popular

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...