Monday, July 4, 2022
Home क्रीडा पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा पेच, बाबर आझमसह 4 क्रिकेटपटू बोर्डावर नाराज

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा पेच, बाबर आझमसह 4 क्रिकेटपटू बोर्डावर नाराज


मुंबई, 11 ऑगस्ट : पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) नवा पेच निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि वन-डे क्रिकेटमध्ये नंबर 1 वर असलेला बॅट्समन बाबर आझम (Babar Azam) सध्या नाराज आहे. आझमच्या नाराजीला पाकिस्तान टीममधील तीन वरिष्ठ खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. मोहम्मद रिझवान, हसन अली आणि शाहिन आफ्रिदी हे टीममधील वरिष्ठ खेळाडू देखील सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर  (Pakistan Cricket Board)  नाराज आहेत.
पाकिस्तान टीममधील या चारही खेळाडू त्यांना मिळणाऱ्या पगारावर नाराज आहेत. त्यांनी बोर्डाकडं पगार वाढवण्याची मागणी केली आहे, अशी माहिती ‘क्रिकेट पाकिस्तान’ नं दिली आहे. या चारही खेळाडूंचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ग्रेड A मध्ये समावेश केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) 2021-22 या वर्षासाठी नवा करारपद्धती जुलै महिन्यात खेळाडूंना दिली आहे. या पद्धतीनुसार सर्व गटातील खेळाडूंना मॅच फिस समान देण्यात येणार आहे. फक्त 4 खेळाडूंचा समावेश A ग्रेडमध्ये करण्यात आला आहे. माजी कॅप्टन अझर अलीचा बी ग्रेडमध्ये तर सर्फराज अहमदचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, वहाब रियाझ या अनुभवी क्रिकेटपटूंचा या करारात समावेश करण्यात आलेला नाही.
बाबर आझमचा पगार किती?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या बाबर आझमचा वार्षिक पगार 64 लाख आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (ViratKohli) बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन जो रुटचा वार्षिक पगार तर विराटपेक्षा जास्त म्हणजे 8 कोटी 97 लाख इतका आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन आरोन फिंच आणि टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेन यांना प्रत्येकी 4.8 कोटी वार्षिक पगार मिळतो.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड दोन्ही टीमला ICC चा झटका, ‘ती’ चूक पडली महाग
दक्षिण आफ्रिका टेस्ट टीमचा कॅप्टन डीन एल्गरचा वार्षिक पगार 3.2 कोटी तर मर्यादित ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन तेंबा वावुमाचा पगार 2.5 कोटी आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनला 1.77 कोटी पगार असून बोनस म्हणून 30 लाख रुपये अतिरिक्त मिळतात. इंग्लंडच्या वन-डे टीमचा कॅप्टन इयन मॉर्गनला 1.75 कोटी, वेस्ट इंडिजच्या मर्यादित ओव्हर्सचा कॅप्टन कायरन पोलार्डला 1.73 कोटी तर टेस्ट टीमचा कॅप्टन क्रेग ब्रेथवेटला 1.39 कोटी वार्षिक पगार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पकसतन #करकटमधय #नव #पच #बबर #आझमसह #करकटपट #बरडवर #नरज

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

उन्हात बाईकवरून कितीही फिरा, तरीही टॅन होणार नाही तुमची स्किन; जाणून घ्या टिप्स

जर तुम्ही दुचाकी वापरत असाल तर उन्हाळा तसचे लाँग ड्राईव्हला गेल्यावर स्किन टॅनिंगची समस्या नक्कीच उद्भवते. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात मुंबईत आंदोलन; पाहा फोटो

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात मुंबईत आंदोलन; पाहा फोटो अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

पराभव जिव्हारी, सपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त, अखिलेश यादवांचा तडकाफडकी निर्णय

लखनऊ : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. मार्चमध्ये झालेली विधानसभा निवडणूक, लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर...

3rd July 2022 Important Events : 3 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

3rd July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Fungal Infection : पावसाळ्यात फंगल इंफेक्शनच्या समस्येपासून अशी सुटका मिळवा

Fungal Infection : पावसाळ्यात (Monsoon) त्वचेसंबंधित (Skin Care) अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा (Fungal Infection) धोका जास्त...

महाराष्ट्रासह दिल्लीची चिंता वाढली,आज सापडले इतके रूग्ण

कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, पाहा महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...