Thursday, May 26, 2022
Home विश्व 'पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं', Imran Khan असं का...

‘पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं’, Imran Khan असं का म्हणाले?


इस्लामाबाद, 14 मे : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) सातत्यानं लष्कर आणि शरीफ सरकारविरोधात बोलत आहेत. चोरांच्या हातात सत्ता देण्यापेक्षा देशावर अणुबॉम्ब (drop atom bomb on pakistan) टाकला असता तर बरं झालं असतं, असं इम्रान यांनी म्हटलं आहे. या चोरट्यांनी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक संस्था आणि न्यायव्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता या गुन्हेगारांची चौकशी कोणता अधिकारी करणार असा सवाल त्यांनी केला. इम्रान खान आपल्या बेताल वक्तव्यांनी देशातील संस्थांना लक्ष्य करून पाकिस्तानी जनतेच्या मनात विष पेरत आहेत, असं पंतप्रधान शाहबाज शरीफ (Prime Minister Shahbaz Sharif) यांनी म्हटले आहे.

सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अत्यंत अस्वस्थ झाले आहेत. ते सातत्याने लष्कर आणि शरीफ सरकारविरोधात बोलत आहेत. चोरांच्या हातात सत्ता देण्यापेक्षा देशावर अणुबॉम्ब टाकला असता तर बरं झालं असतं, असं वक्तव्य आता त्यांनी केलंय. खान यांनी शुक्रवारी बनिगाला निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना हे धक्कादायक विधान केलं.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान म्हणाले, ‘या चोरांनी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक संस्था आणि न्यायालयीन यंत्रणा उद्ध्वस्त केली आणि आता या गुन्हेगारांविरुद्ध कोणता अधिकारी तपास करणार असा सवाल आहे.’ इम्रान खान आपल्या बेताल शब्दांनी देशातील संस्थांना लक्ष्य करून पाकिस्तानी जनतेच्या मनात विष पेरत आहेत, असं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

हे वाचा – 14 वर्षांच्या मुलाला 10 मिनिटांत ठरवलं दोषी आणि दिला मृत्यूदंड! 70 वर्षांनी समोर आलं सत्य

 देशात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या नियमित अधिवेशनादरम्यान पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, “इम्रान खान यांनी वारंवार तत्कालीन विरोधकांना आणि आता सरकारमधील लोकांना चोर आणि डाकू म्हटल्यामुळे देशाचे तुकडे झाले आहेत.”

‘माझ्या सरकारविरोधात सातत्यानं षडयंत्र रचलं’

इम्रान खान यांनी दावा केला होता की, त्यांना गेल्या वर्षी जूनमध्येच त्यांच्या सरकारविरोधात रचल्या जात असलेल्या कटाची माहिती मिळाली होती. त्यांचं सरकार कमकुवत करण्यासाठी सातत्यानं निर्णय घेतले गेले.

हे वाचा – 13 वर्षांचा मुलगा 66 दिवस घरात एकटाच राहिला आणि चमत्कार घडला, घडलं असं काही…

 पीटीआय अध्यक्षांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारला इशारा दिला होता की, 20 मे रोजी लाँग मार्च दरम्यान राजधानी इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्यापासून कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नाही.

त्यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग नवाजच्या नेतृत्वाखालील सरकारला इशारा दिला आहे की, 20 लाखांहून अधिक लोक खरं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि आयात केलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी इस्लामाबादमध्ये पोहोचतील. पाकिस्तानचं सध्याचं सरकार त्यांच्या धाडसीपणाला घाबरतं. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी 11 पक्षांची मदत घेण्यात आल्याचं इम्रान यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पकसतनवर #अणबमब #टकल #असत #तर #बर #झल #असत #Imran #Khan #अस #क #महणल

RELATED ARTICLES

‘हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!’ नव्या मालिकेमुळे अभिजीत खांडकेकर ट्रोल

मुंबई, 26 मे:  'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Maziya Priyala Preet Kalena) मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे 'अभिजीत खांडकेकर' (Abhijeet...

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

Most Popular

Flipkart ची जबरदस्त ऑफर! 18,000 रुपये किमतीचा Kodak 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; जाणून घ्या

 Flipkart Electronics Sale : फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन कॉमर्स साईट्सवर इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरु झाला आहे.  हा सेल 24 मे पासून सुरु...

पटिदारच्या शतकामुळे बंगळूरुची आव्हानात्मक धावसंख्या

कोलकाता : रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २० षटकांत ४...

लखनौच्या पराभवानंतर भडकला होता गौतम गंभीर, आयपीएलबाहेर पडल्यावर दिली पहिली प्रतिक्रीया…

गौतम गंभीर लखनौच्या सामन्यानंतर कशी प्रतिक्रीया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. लखनौचा संघ जेव्हा विजयी ठरायचा तेव्हा गंभीरच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल...

AC: टेन्टसारखा दिसणारा ‘हा’ हटके AC फक्त बेडचा एरिया करतो कूल, विजेचा वापर देखील कमी, किंमत नाही जास्त

नवी दिल्ली:Bed AC : आजकाल अनेकांच्या घरी एसी हमखास असतोच. मात्र एसी सतत चालू राहिल्याने वीज बिलही खूप येते. ज्याचा युजर्सच्या खिशावर परिणाम...

घटस्फोटानंतर देखील महिलेला पतीचा कंटाळा? घरासोबत पतीची देखील बोली!

महिला पतीला इतकी कंटाळली? म्हणते, 'माझं घर खरेदी करा आणि माझ्या पतीला पण ठेऊन घ्या...'   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...