Saturday, August 13, 2022
Home भारत पाकिस्तानमधून आलेल्या कबुतरानं आणले नाकी नऊ, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झाली सतर्क

पाकिस्तानमधून आलेल्या कबुतरानं आणले नाकी नऊ, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झाली सतर्क


जयपूर, 2 ऑगस्ट : पाकिस्तानच्या दिशेनं आलेलं एक कबुतर (Pigeon) गावातील काहीजणांनी पकडलं तेव्हा त्याच्या पंखांवर एक मोबाईल नंबर  (Mobile number) लिहिल्याचं ग्रामस्थांना दिसलं. त्याचप्रमाणं त्याच्या पायाला एक छोटी साखळीवजा वस्तू बांधल्याचंही (Tied to feet) दिसलं. हा प्रकार संशयास्पद (doubtful) वाटल्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना (Police) याची माहिती दिली. ही घटना घडली राजस्थानच्या (Rajasthan) बिकानेर (Bikaner) जिल्ह्यातील तेजाणा गावात.
कबूतर सापडल्यावर हालचालींना वेग

बिकानेर हा राजस्थानमधील जिल्हा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यात नेहमीच पाकिस्तानच्या दिशेनं उडत येणारे पक्षी येत असतात, तर भारतातीलही अनेक पक्षी पाकिस्तानकडे जात असतात. नेहमीच्या सवयीप्रमाणं ग्रामस्थांनी पाकिस्तानच्या दिशेनं आलेलं एक कबुतर पकडलं आणि त्यावर लिहिलेला मोबाईल नंबर पाहून पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी याची माहिती घेतली असता, हा नंबर पाकिस्तानातील असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली असून या कबुतराच्या अंगावरील नंबर आणि त्याच्या पायाला बांधलेल्या साखळीमागे काय दडलंय, याचा शोध घेतला जात  आहे.

तपास सुरु

हे कबुतर पाकिस्तानमधून कुणाकडे आलं होतं, याचा सध्या तपास सुरु आहे. त्याच्या पायाला दिसणारी लोंबती साखळी हा पोलिसांपुढे मोठा प्रश्न आहे. त्याला बांधून कुठली वस्तू भारतात आली का, याचादेखील पोलीस शोध घेत आहेत. हे कबुतर बिकानेर परिसरातील एखाद्या नागरिकाचं तर नाही ना, या दिशेनंही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कबुतराच्या अंगावर लिहिलेला नंबर पाकिस्तानमधील असल्याने तिथपर्यंत पोहोचणे गुप्तचर यंत्रणांसाठी आव्हानात्मक आहे.

हे वाचा -उघड लाच मागणाऱ्या पालिकेतल्या भ्रष्ट अधिकारी आणि क्लार्क महिलेला रंगेहाथ पकडलं

यापूर्वीही अशा प्रकारे अनेक कबुतरं पाकिस्तानमधून भारतात आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र यावेळी कबुतरावर लिहिलेला नंबर आणि त्याच्या पायाला बांधलेल्या साखळीमुळे गुप्तचर विभाग सतर्क झाला आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पकसतनमधन #आललय #कबतरन #आणल #नक #नऊ #पलस #आण #गपतचर #यतरण #झल #सतरक

RELATED ARTICLES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

भारतीय महिला बुद्धिबळपटूंची प्रगती अधोरेखित!; ऑलिम्पियाडमधील पहिल्या पदकाबाबत प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचे मत

अन्वय सावंत मुंबई : गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...