Highest Temperature in Pakistan : पाकिस्तानच्या जेकोबाबाद शहरात जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. जेकोबाबाद शहरात कालचं कमाल तापमान हे 51 अंश सेल्सिअस होतं. 2022 सालातील जगातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद पाकिस्तानात झाली आहे. याआधी ऑस्ट्रेलियात 50.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पाकिस्तानात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे.
पाकिस्तानसोबतच भारतात देखील अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. पश्चिम राजस्थानात तापमान 48 अंशांच्या पार गेले आहे. काल पश्चिम राजस्थानात एका ठिकाणावरील कमाल तापमान 48.2 अंशांवर गेले आहे. 13 मे रोजी पिलानी येथे 47.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानाची तीव्रता वाढली आहे. यामुळे नागिरकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भारतात देखील तापमानात चांगलीच वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक राज्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. वातावरण सातत्याने बदलत आहे, कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. वातावरणात आर्द्रता वाढत असल्यामुळे पावसाचे ढग जास्त वेळ आर्द्रता रोखू शकत नाहीत. कमी वेळात पाऊस होतो. याचा परिणाम म्हणजे दुष्काळ पडत असून उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होत आहे. हिवाळ्या देखील पश्चिमेकडून येणारी हवा अरबी समुद्रावरून जात उष्ण होत असल्याने उन्हाळ्यासोबत हिवाळ्यातही दिवसाचे तापमान वाढत आहे.
दिवसेंदिवस तापामानाचा पारा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र राज्यातही बहुतांश जिल्ह्यात 40 ते 45 अंशाच्या आसपास तापमानाचा पारा आहे. एका बाजुला उष्णतेमुळे नागरिक हैराण होत असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना या वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानवाढीचा पिकांवर परिणाम झाल्याने उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे भारतीय हवामान विभागाकडून पावसाचे वेळोवेळी अंदाज वर्तवले जातात, तसेच अंदाज उष्णतेच्या बाबतीत देखील द्यायला हवेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#पकसतनमधल #जकबबद #शहरत #जगतल #सरवचच #तपमनच #नद