Saturday, August 13, 2022
Home क्रीडा पाकिस्तानच्या काश्मीर लीगबाबत बीसीसीआयने कडक पवित्रा घेतल्यावर शाहिद आफ्रिदी भडकला, म्हणाला...

पाकिस्तानच्या काश्मीर लीगबाबत बीसीसीआयने कडक पवित्रा घेतल्यावर शाहिद आफ्रिदी भडकला, म्हणाला…


नवी दिल्ली : पाकिस्तान आता काश्मीर प्रीमिअर लीग ही ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरु करणार आहे. पण या स्पर्धेबाबत बीसीसीआयने कडक पवित्रा घेतला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा हर्षेल गिब्ज हा या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक होता. पण जर या लीगमध्ये खेळलास तर भारतात पाय ठेवू देणार नाही, अशी कडक भूमिका बीसीसीायने घेतली होती. आता बीसीसीआयच्या या भूमिकेवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय, समजून घ्या…
काश्मीर हा आंतरारष्ट्री स्तरावर वादाचा मुद्दा आहे. पण काश्मीर आमचाच एक भाग आहे, हे पाकिसतान बरेच वर्षांपासून सर्वांना भासवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच त्यांनी आता ही एक नवीन चाल खेळली आहे. पाकिस्तानने आता काश्मीर प्रीमिअर लीग आयोजित करण्याचे ठरवले आहे, जेणेकरून काश्मीरची लीग पाकिस्तान आयोजित करत असेल तर हा प्रदेश त्यांचाच आहे, असा गैरसमज विश्वात पसरू शकतो आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी या लीगचे आयोजन करत असल्याचे म्हटले जात आहे. पण बीसीसीआयने या लीगला आक्षेत घेत कडक पवित्रा घेतला आहे, त्यामुळेच त्यांना अजून आयसीसीकडून लीग खेळवण्याची परवानगी मिळालेली नाही.

शाहिद आफ्रिदी बीसीसीआयवर भडकल्यावर काय म्हणाला, पाहा…
जो खेळाडू या लीगमध्ये खेळेल, त्याला भारतात पाय ठेवू देणार नाही, असे बीसीसीआयने म्हटले होते. यावर आफ्रिदी म्हणाला की, ” भारताने पुन्हा एकदा निराश केले आहे. कारण त्यांनी राजकारण आणि क्रिकेट यांची गल्लत केली आहे. ही लीग काश्मीरच्या लोकांसाठी आहे. पाकिस्तान आणि क्रिकेटचे चाहते हे जगभरात पसरलेले आहेत. आम्ही एक चागलं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत, यामध्ये वाईट असं काहीच नाही.”

बीसीसीआयने या लीगबाबत कोणता कडक पवित्रा घेतला होता, पाहा…
हर्षेल गिब्ज हा काश्मीर प्रमिअर लीगमध्ये खेळण्यात उत्सुक होता. पण त्याचवेळी बीसीसीआयने त्याला स्पष्ट सांगितले होते की, जर तु या लीगमध्ये खेळलास तर भारतामध्ये क्रिकेटबाबत कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुला पायही ठेवू देणार नाही. बीसीसीआयने आपल्याला अशी धमकी दिल्याचेही गिब्जने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पकसतनचय #कशमर #लगबबत #बससआयन #कडक #पवतर #घतलयवर #शहद #आफरद #भडकल #महणल

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...