पाकिस्तानचा दुतोंडीपणा
एकीकडे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तान हा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत आपली ताकद वाढवत असल्याचं चित्र आहे. चीन हा आपला नैसर्गिक मित्र असल्याचं सांगत पाकिस्तानकडून चीनी सैन्याच्या स्थापनादिनी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे, तर दुसरीकडं तालिबानच्या मदतीसाठी दहशतवादी पाठवणंही पाकिस्ताननं सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताविरोधात ताकद एकवटण्यासाठी चीनला जवळ करत असल्याचं आणि दुसरीकडं तालिबानसोबत संबंध अधिक दृढ करत असल्याचं चित्र आहे.
चीन आणि तालिबान
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी नुकतीच तालिबानी नेत्यांची भेट घेतली. चीन सध्या तालिबानसोबत आपले संबंध सुधारत असल्याचं चित्र आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची संभाव्य सत्ता लक्षात घेऊन आपले व्यापारी आणि लष्करी हितसंबंध जोपासायला चीननं सुरुवात केली आहे. तर पाकिस्ताननेही तालिबानशी जवळीक वाढवली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतासमोर अधिक आव्हानं निर्माण होण्याची शक्यता आहे.
हिताची भाषा
चीन आणि तालिबानसोबत एकाच वेळी जवळीक करण्याबाबत पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमल जावेद बाजवा यांना विचारलं असता त्यांनी गोलमोल उत्तर देणं पसंत केलं आहे. आम्ही आपापल्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आणि परस्पर सलोखा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचा -श्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण
भारतासमोर आव्हान
एकीकडं विस्तारवादी असणारा आणि सातत्याने भारतीय सीमेत घुसखोरी करू पाहणारा चीन, दुसरीकडं दहशतववाद पोसणारा पाकिस्तान यामुळे भारतासमोर डोकेदुखी वाढणार आहे. त्यातच अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार येणं आणि पाकिस्तानचे तालिबानसोबत सलोख्याचे संबंध असणं, ही बाबदेखील भारतासाठी फारशी आशादायक नसल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#पकसतनच #दतडपण #चवहटयवर #चनसबत #सगनमत #करन #तलबनल #मदत