Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट पश्चिम आफ्रिकेत कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य Marburg virus चा पहिला रुग्ण; जाणून घ्या लक्षणं,...

पश्चिम आफ्रिकेत कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य Marburg virus चा पहिला रुग्ण; जाणून घ्या लक्षणं, कारणं


Marburg virus : पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये प्रशासनानं जीवघेण्या मारबर्ग व्हायरस (Marburg virus)चा प्रादुर्भाव झाल्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेत मरबर्ग व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. आफ्रिकेतील इबोला या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वीच कमी झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांतच एका व्यक्तीला संसर्गजन्य ताप आल्याचं पाहायला मिळालं होतं. दक्षिण गिनीच्या गुआकेडो प्रांतात या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाप्रमाणेच वेगानं पसरतो Marburg virus

सध्या जग कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरशी लढतोय. अशातच आता कोरोनाप्रमाणेच वेगानं पसरणाऱ्या Marburg virus चा पहिला रुग्ण आफ्रिकेत आढळून आला आहे. मारबर्ग व्हायरस (Marburg virus) हा संसर्गजन्य विषाणू आहे. आफ्रिकेतील डब्ल्यूएचओ (WHO) चे क्षेत्रीय निर्देशक, मात्शिदिसो मोएती यांनी बोलताना सांगितलं की, हा व्हायरस अत्यंत घातक असून संसर्गजन्य आहे. त्यामुळे याला लवकरात लवकर थोपवणं गरजेचं आहे. सेनेगलची राजधानी डाकारमधील पाश्चर इन्स्टिट्यूटने साईटवरील प्राथमिक तपासणीची पुष्टी केली आहे. सध्या मारबर्ग व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाचा शोध सुरु आहे. 

डब्ल्यूएचओ (WHO) नं दिलेल्या माहितीनुसार, मारबर्ग व्हायरस वटवाघुळानं खाल्लेली फळं खाल्यानं माणवामध्ये पसरतो. मारबर्ग व्हायरसची लागण झालेल्या बाधित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांशी थेट संपर्कात आल्यानं याचा संसर्ग होतो. त्यानंतर हा व्हायरस मनुष्यापासून मनुष्यापर्यंत प्रसारित होतो. 

Marburg virusची लक्षणं : 

  • ताप 
  • डोकेदुखी
  • शरीरांतर्गत रक्तस्त्राव

Marburg virusच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी यांसारख्या समस्यांसोबतच शरीरांतर्गत रक्तस्त्राव यांसारख्या लक्षणांचाही समावेश आहे. डब्ल्यूएचओनं दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचा मृत्यूदर 24 ते 88 टक्क्यांमध्ये आहे. तसेच या व्हायरसविरोधात प्रतिबंधक लस अद्याप उपलब्ध नाही. 

दरम्यान, गेल्या वर्षी गिनीमध्ये इबोला आजाराचा उद्रेक झाला होता, जो डब्ल्यूएचओने जूनच्या मध्यापर्यंत संपवण्याची घोषणा केली होती. गिनीमध्ये इबोला आजारामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पशचम #आफरकत #करनपरमण #ससरगजनय #Marburg #virus #च #पहल #रगण #जणन #घय #लकषण #करण

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

मराठी टीव्हीविश्वात दाक्षिणात्य तडका, या मालिका चर्चेत

बॉलिवूड इंडस्ट्री ही टॉलिवूडच्या प्रेमात आहे हे काही नवीन नाही. दाक्षिणेकडील हिंदीमध्ये डब करण्यात आलेले 'पुष्पा: द राइझ', 'बाहुबली', 'केजीएफ', 'आरआरआर' हे सिनेमे...

चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! MS Dhoni या आजाराने त्रस्त

महेंद्रसिंह धोनी सध्या या आजारावर वैद्यांकडून उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

पाकिस्तानला ब्रिक्स परिषदेचा झटका, भारताच्या भूमिकेनंतर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली :भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका,चीन आणि रशिया या देशांनी एकत्र येत ब्रिक्स समुहाची स्थापना केली आहे. ब्रिक्सची परिषद चीननं २३ आणि २४...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गोव्यात जंगी स्वागत; आमदारांच्या जल्लोषाचा नवा VIDEO

मुंबई 01 जुलै : मागील जवळपास 10 दिवसांपासून राज्यात राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला होता. यादरम्यान भरपूर मोठ्या घडामोडी घडल्या. यात ठाकरे...

रस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...