Thursday, May 26, 2022
Home भारत पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती, नाना पटोलेंचा गंभीर आरोप


Nana Patole On NCP :  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर (Sharad Pawar and Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  राष्ट्रवादीचा भाजपसोबत मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे.  तर पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादीचं भाजपशी साटंलोटं असून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात नाना पटोलेंनी हल्लाबोल केला आहे.  उदयपूरमध्ये काँग्रेसचं नवसंकल्प शिबिर सुरु आहे. याठिकाणी एबीपी माझाशी बोलताना पटोले यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी नुकतंच नाना पटोलेंचं खंजीर खुपसण्याचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं. तसंच पटोलेंनी पक्ष किती वेळा बदलला तपासावं मग खंजीर खुपसण्याबद्दल बोलावं, असंही अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावरुन पटोलेंनी हा हल्लाबोल केला आहे. 
 
पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती

पटोले यांनी म्हटलं की, पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही.  त्यांचे पाप लपविण्यासाठी त्यांच्याकडून काँग्रेसवर आरोप करण्यात येत आहे. मी कुणावर टीका करणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  2010 पासूनची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाचून दाखवण्यात आली असती तरी ती केवळ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यामुळेच असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ज्या लोकांचा ते उल्लेख करताय ती लोक आज भाजपमध्ये आहेत. म्हणून राष्ट्रवादीकडून दाखवण्यात येणारी यादी म्हणजे आपले पाप लपविण्यासाठी केलेला एक अयशस्वी प्रयत्न आहे, असंही पटोले म्हणाले. 

नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादीच्या पूर्व इतिहासात मला जायचे नाही, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली आहे. मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टीवर जायचे नाही. मात्र पवार परिवार राजकीय व्यवस्थेत कसे आहेत हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळं मला त्यावर बोलायचं नाही, असे म्हणत नाना पटोलेंनी निशाणा साधला आहे.

नाना पटोलेंनी म्हटलं की, पहाटेच्या शपथविधीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधींनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला, तो आम्ही पाळला आहे. मात्र राष्ट्रवादी भाजपला वाढविण्यासाठी त्यांच्याशी साठंगाठं करीत काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा आम्ही विरोध करतो असा टोला नाना पटोंलेंनी पवारांना लगावला आहे. राज्यात पाप राष्ट्रवादी लपविण्याचे प्रयत्न करते आहे, असंही ते म्हणाले. माझा इतिहास अजित पवारांनी काढला असेल, मात्र माझी समोरूनची लढाई असते, मी मागून लढत नाही आणि पवारांचा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे मला त्यात पडायचे नाही असे म्हणत येणाऱ्या निवडणुकात योग्य निर्णय हायकंमाड करेल असंही त्यांनी म्हटलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

Nana Patole : पाप लपवण्यासाठी राष्ट्रवादीचे अयशस्वी प्रयत्न, नाना पटोलेंचा हल्लाबोल ABP Majha

Ajit Pawar On Nana Patole :नाना पटोलेंनी पक्ष किती वेळा बदलला तपासावं मग खंजीर खुपसण्याबद्दल बोलावं

Nana Patole : राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर नाना पटोले यांचं वक्तव्यअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पवर #कटबच #इतहस #सगळयन #महत #नन #पटलच #गभर #आरप

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

फक्त चवीसाठी नव्हे, कढीपत्त्याचे आरोग्यासाठी आहेत इतके फायदे; हाडांसाठी गुणकारी

नवी दिल्ली, 26 मे : कढीपत्ता (Curry leaves) हा सामान्यतः दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो. खाद्यपदार्थांना एक विशेष चव आणण्यासाठी त्याचा वापर...

तुमच्या मोबाईलवर ‘रेड वॉर्निंग’ चा इशारा येतोय का? आताच पाहा ही बातमी

मुंबई : गुगल, या सर्च इंजिनकडून कायमच युजर्सच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. सायबर क्राईमपासून युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांची खासगी माहिती गोपनीय ठेवण्यासाठी...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

iPhone Offers: अर्ध्या किमतीत iPhone 12 आणि iPhone 13 होणार तुमचा, या साईटवरून करा खरेदी, पाहा डील

नवी दिल्ली: Discounts On iPhone:iPhone साठी खूप पैसे खर्च करणे शक्य नसल्यामुळे प्रत्येकाला आयफोन खरेदी करता येत नाही. हेच कारण आहे की, iPhone...

व्हिडीओ गेम खेळत टॉयलेट सीटवर बसताच सापाने साधला डाव; गुप्तांगात दात घुसले आणि..

क्वालालांपूर, 25 मे : सध्या उठता-बसता, चालता-फिरता, खाता-पिता प्रत्येक ठिकाणी मोबाईल हा आपल्यासोबतच असतो. अनेकांच्या बाबतीत तर याला टॉयलेटही अपवाद नाही. बाथरूम, टॉयलेटमध्येही...