नेमके काय आहे प्रकरण?
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, असे सांगण्यात येत आहे की, जेव्हा पतीने त्याच्या पत्नीवर हल्ला केला तेव्हा त्याच्या 12 वर्षीय मुलीने आईला वाचवायचा प्रयत्न केला आणि तिच्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिलाही जोरदार मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. यावेळी पती दारुच्या नशेत होता. तो घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की, त्याची पत्नी कुणासोबत तरी फोनवर बोलत आहे. (Wife on Call with Someone)
मुलीने वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र…
यानंतर तो तिच्यावर संतापला. याच संतापातून त्याचे चाकू घेतला तसेच तिच्यावर हल्ला केला. यावेळी दुसऱ्या रुममध्ये झोपलेली त्यांची मुलगी उठली. तिने आपल्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिला मारहाण केली. तसेच आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करत तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडले.
हेही वाचा – विधवा सांगून केले लग्न, आठवड्याभरातच पैसे आणि दागिने घेऊन तरुणी फरार
या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. शेजाऱ्यांनी लगेचच या घटनेबाबत पोलिसांना सांगितले. तसेच शेजाऱ्यांनी त्या महिलेला रुग्णालयात घेऊन गेले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#पतन #कणश #तर #फनवर #बलत #असलयच #पहन #सतपल #पत #उचलल #धककदयक #पऊल