Saturday, August 13, 2022
Home करमणूक पत्नीला मारहाण, मानसिक छळ;यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल

पत्नीला मारहाण, मानसिक छळ;यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल


हायलाइट्स:

  • गायक हनी सिंगविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
  • दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात झाला गुन्हा दाखल
  • २८ ऑगस्टपर्यंत नोटिसीला उत्तर देण्यास सांगितले

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी हिने त्याच्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम,’ अंतर्गत याचिका दाखल केली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने हनी सिंगला नोटीस पाठवली असून त्याच्याकडून उत्तर मागितले आहे.

तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांच्यासमोर हनी सिंहची पत्नी शालिनी तलवार हिने मंगळवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.हनी सिंहच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर महानगर दंडाधिकारी तानिया सिंगयांनी त्याला नोटिस पाठवली.

शालिनी यांनी केलेल्या तक्रारीमध्ये हनी सिंहने आपल्याला मारहाण केली, लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. हनीबरोबरच त्याचे आई-वडिल आणि बहिणीच्याविरोधातही मारहाण करणे, छळ करणे आणि शोषण केल्याचे आरोप केले आहेत.

शालिनी तलवारने केलेल्या याचिकेवर तीस हजारी न्यायालयाने हनीच्या विरोधात नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी त्याला २८ ऑगस्टच्या आधी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच दोघांची संयुक्त मालमत्ता विकू नये आणि शालिनीचे स्त्रीधनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने या नोटिसीद्वारे दिले आहेत.

कोण आहे हनी सिंह

AssignmentImage-2086255637-1628000224

यो यो हनी सिंगचे खरे नाव हर्देश सिंगआहे. मूळचा पंजाबचा हर्देश ‘कॉकटेल’ चित्रपटानंतर यो यो हनी सिंगया नावाने खूप प्रसिद्ध झाला. दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘अंग्रेजी बीट’ हे गाणे त्याने गायले होते. हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

AssignmentImage-12814986-1628000224

२०१४ मध्ये, रियॅलिटी शो ‘इंडियाज रॉकस्टार’च्या माध्यमातून पहिल्यांदा हनी सिंहने आपली पत्नी शालिनी हिची सर्वांशी ओळख करून दिली होती. या दरम्यान, हनी सिंहची पत्नी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, कारण ब-याच लोकांना हनी सिंग विवाहित आहे, हे माहितही नव्हते. हनी आणि शालिनी हे अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होते. त्यांनी २०११ मध्ये लग्न केले. हनी सिंहने त्याच्या आवाजाने हिंदी सिनेमासृष्टीमध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले होते. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तो अचानक गायब झाला. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार हनी सिंगदारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पतनल #मरहण #मनसक #छळय #य #हन #सगवरधत #तकरर #दखल

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

हृता दुर्गुळेचा नवरा प्रतीक शाह आहे गुजराती? अभिनेत्रीनं केला खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट:  तब्बल 10 वर्ष टेलिव्हिजन गाजवून आता मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे. दुर्वा, फुलपाखरु आणि मन...

Salman Khan ने ज्या काळविटाला मारलं त्याचाचं गावकऱ्यांनी उभारला पुतळा

खऱ्या खुऱ्या शिंग, 800 किलो लोखंड आणि सिमेंटचा वापर करत साकारला काळविट, हरणाच्या पुतळ्याची एकच चर्चा  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

पार्टनरची मनातलं ओळखताच येत नाहीची तक्रार होईल बंद

आपल्या जोडीदाराने आपल्याला अगदी पूर्णपणे ओळखावं अशी अनेकांची इच्छा असते. यामध्ये एका गोष्टीचा अट्टहास असतो की माझ्या मनातलं सुद्धा ओळखायला हवं. आता आपल्याकडे...

Azadi Ka Amrit Mohotsav: पुणे आरटीओतर्फे जल्लोषात ‘बाईक रॅली’

Azadi Ka Amrit Mohotsav: आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पुणे RTOतर्फे जल्लोषात 'बाईक रॅली' अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...

पुण्यात चंद्रकांत पाटील नाही तर राज्यपालच करणार15 ऑगस्टला ध्वजारोहण

Pune independence day 2022: पुण्यात (Pune)15 ऑगस्टचे ध्वजारोहण कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील  पुण्याऐवजी कोल्हापूरला (Kolhapur) करणार आहेत. तसं...