Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या पक्षादेश न मानल्याने राज्यसभेतून खासदार झाले होते अपात्र, शिंदे गटाला हा निकष...

पक्षादेश न मानल्याने राज्यसभेतून खासदार झाले होते अपात्र, शिंदे गटाला हा निकष लागू शकतो का?


Maharashtra political crisis : राज्यात सुरु असलेला अभूतपूर्व राजकीय संघर्ष आता कायदेशीर मार्गाने जाण्याची दाट शक्यता आहे. संख्याबळाचा विचार करता एकनाथ शिंदे गटाकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे गटाने आज एबीपी माझाशी बोलताना आपल्याकडे मेजॉरिटी असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे 12 आमदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्रक्रियेमध्ये स्वतः अध्यक्ष शरद पवार यांनी काल बंडखोर आमदारांना मुंबईत यावंच लागेल असे सांगितल्यानंतर  एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले आहे, की कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या असंख्य निकाल आहेत. 

पक्षादेश न मानल्याने शरद यादव यांना राज्यसभेतून अपात्र  ठरले होते 

मात्र, पक्षादेश न मानल्याने शरद यादव यांना राज्यसभेतून 2017 अपात्र ठरवण्यात आले होते. जनता दल युनायटेडने (JDU) पक्षाच्या निर्देशाचे उल्लंघन करून पाटणा येथे विरोधी पक्षांच्या रॅलीत हजेरी लावल्याच्या कारणावरून त्यांची राज्यसभेतून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर जेडीयूचे बंडखोर खासदार शरद यादव आणि अली अन्वर यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्यात आले.

दोन वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन करून आणि विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे सदस्यत्व “स्वेच्छेने सोडले” होते, या JDU च्या युक्तिवादाला राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सहमती देत राज्यसभेतून अपात्र ठरवले होते. 

जेडी(यू) ने त्यांच्या निर्देशाचे उल्लंघन करून पाटणा येथे विरोधी पक्षांच्या रॅलीत हजेरी लावल्याच्या कारणावरून त्यांची अपात्रता मागितली होती. जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील महाआघाडीला धुडकावून लावल्यानंतर आणि भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर यादव यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली होती.

शिंदे गटाकडून नव्याने पत्र

दरम्यान, शिंदे गटाकडून 37 शिवसेना आमदारांच्या सहीचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना काल रात्री पाठवले आहे. त्यापूर्वीच शिवसेनेकडून 12 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी पत्र दिले आहे. त्यामुळे या राजकीय साठमारीत विधानसभा उपाध्यक्ष काय निर्णय घेतात आणि त्यांनी घेतलेला कायद्याच्या पातळीवर उचित ठरतो की तो रद्दबातल ठरवला जाईल हे येणारा काळ सांगणार आहे.  दोन्ही गटाकडून कायदेशीर लढाई लढली जाईल, यात शंका नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पकषदश #न #मनलयन #रजयसभतन #खसदर #झल #हत #अपतर #शद #गटल #ह #नकष #लग #शकत #क

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

‘मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका, ही तात्पुरती व्यवस्था’: संजय राऊत

Sanjay Raut On Maharashtra Election : शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

बहुप्रतीक्षित Asus ROG Phone 6 मार्केटमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज, प्रोसेसर- फीचर असतील बेस्ट, पाहा लाँच डेट

नवी दिल्ली : Asus ROG Phone 6 Luanch Date: Asus ROG Phone 6 बाबत बाजारात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. फॅन्स या ROG...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...