वाचा – रिषभ पंतने वादळी शतकासह पाडला विक्रमांचा पाऊस, रचला इतिहास
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात विशेष झाली नाही आणि १०० धावसंख्येच्या आतच त्यांनी पाच विकेट गमावल्या. अशा स्थितीत यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची शानदार भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. पंतने १११ चेंडूत २० चौकार आणि चार षटकारांसह १४६ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. तर जडेजाने आतापर्यंत १६३ चेंडूंचा सामना करत १० चौकार मारले आहेत.
वाचा – पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला ‘इंद्रानगरचा गुंड’
जॅक लीचला धुतलं
चहापानानंतर पंत आणि जडेजाने ताबडतोड फलंदाजी सुरु केली. पंतने फिरकी गोलंदाज जॅक लीचला टार्गेट केला आणि त्याच्या चेंडूंवर काही मोठे फटके मारले. पंतने केवळ ८९ चेंडूत शतक पूर्ण केले, जे भारतीय यष्टीरक्षकाचे सर्वात वेगवान कसोटी शतक ठरले. शतक झळकावल्यानंतर पंतने अधिक आक्रमक शैलीत फलंदाजी केली. मात्र, पंतला १५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. जो रूटने पंतला जॅक क्रॉली करवी झेलबाद केले. पंत बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर अवघी एक धाव करून माघारी परतला. शार्दुलला बेन स्टोक्सने यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सच्या हाती झेलबाद केले.
वाचा – दे दणादण… रिषभ पंतने तुफानी फलंदाजी करत केली इंग्लंडची धुलाई, भारताचा धावांचा डोंगर
अँडरसनने दिले सुरुवातीचे धक्के
पहिल्या सत्रात जेम्स अँडरसनने सलामीवीर शुभमन गिल (१७ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (१३ धावा) दुसऱ्या स्लिपमध्ये जॅक क्रॉलीच्या हाती बाद करून इंग्लंडला यश मिळवून दिले. अँडरसनने पुजाराला कारकिर्दीत १२ व्या वेळी, तर गिल तिसऱ्यांदा बाद केले. पुजारा बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि विराट कोहली यांच्यावर मोठी भागीदारी करण्याची जबाबदारी होती, मात्र दोन्ही खेळाडू फार काही करू शकले नाहीत.
कोहली-अय्यर-विहारीही फ्लॉप
मॅटी पॉट्सचा आत येणारा चेंडू हनुमा विहारी चुकवू शकला आहि आणि चेंडू पॅडला लागला. विहारी बाद झाल्यानंतर काही वेळातच स्टार फलंदाज विराट कोहलीही स्वस्तात परतला. विराट कोहलीला (११ धावा) ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू सोडायचा होता, पण चेंडू बॅटच्या कडेला लागून थेट स्टंप्सला लागला. यानंतर श्रेयस अय्यर (१५ धावा) बाद झाला. शॉर्ट पिच बॉलवर श्रेयसला अँडरसनने यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सच्या हाती झेलबाद केले.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#पतजडजच #कऊटर #अटक #इगलड #गलदजन #शकवल #चगलच #धड #अस #कल #पलटवर