Saturday, November 27, 2021
Home भारत पंतप्रधान मोदींची आहे एक पाकिस्तानी बहीण; गेली 26 वर्षं न चुकता मोदींना...

पंतप्रधान मोदींची आहे एक पाकिस्तानी बहीण; गेली 26 वर्षं न चुकता मोदींना राखी बांधणारी ही महिला आहे कोण?


अहमदाबाद, 18 ऑगस्ट : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची एक पाकिस्तानी बहिण (Pakistani sister) गेल्या 26 वर्षांपासून दर राखी पौर्णिमेला त्यांना राखी (Rakhi) बांधते. कमर जहां (Kamar Jahan) यांनी यंदादेखील मोदींसाठी एक सुंदर राखी तयार केली असून पंतप्रधान असणाऱ्या आपल्या भावाला बांधण्यासाठी त्या आतूर आहेत. भावाबहिणीच्या प्रेमाचा संदेश या राखीवर लिहिण्यात आला असून मोदींनी हा बंधुभाव गेल्या 26 वर्षांपासून जपून ठेवला आहे.

कोण आहेत कमर जहां

कमर जहां यांचा जन्म पाकिस्तानातील असल्यामुळे त्यांना पाकिस्तानी म्हटलं जातं. मात्र त्यांचा विवाह भारतातील प्रसिद्ध चित्रकार मोहसीन शेख यांच्याशी झाला आहे. मोहसीन शेख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांचे जुने मित्र असून तरुण असल्यापासून ते एकमेकांना ओळखतात. मोहसीन शेख यांच्यामुळेच कमर जहां यांचा मोदींशी परिचय झाला आणि राखी बांधायला सुरुवात झाली.

अशी बांधली पहिली राखी

26 वर्षांपूर्वी मोहसीन शेख हे कमर जहांसोबत नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी कमर जहांची विचारपूस करताना त्यांचा जन्म पाकिस्तानातील असून त्या लग्न होऊन भारतात आल्याचं समजल्यावर मोदींनी त्यांचा बहिण असा उल्लेख करत स्वागत केलं होतं. त्यावर कमर जहां यांनी भारतात आपला कुणीही भाऊ नसून तुम्हीच माझे भाऊ बनाल का, असा सवाल मोदींना केला होता. त्यावर मोदींनी हसतमुखाने आपला हात समोर करत त्यांच्याकडून राखी बांधून घेतली होती. तेव्हापासून दर वर्षी कमर जहां नरेंद्र मोदींना राखी बांधतात.

हे वाचा -Tata Steel खरेदी करणार ही सरकारी कंपनी? वाचा काय आहे योजना

गेल्या वर्षी कोरोनामुळे हुकले रक्षाबंधन

गेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कमर जहां यांना मोदींना भेटणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पोस्टाने राखी पाठवली होती. यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे आपल्याला मोदींना भेटण्याची आणि त्यांना राखी बांधण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा कमर जहांना आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पतपरधन #मदच #आह #एक #पकसतन #बहण #गल #वरष #न #चकत #मदन #रख #बधणर #ह #महल #आह #कण

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...