Thursday, May 26, 2022
Home क्रीडा पंजाबच्या विजयाने प्लेऑफचे गणित बदलले; RCBसह चार संघांचे टेन्शन वाढले

पंजाबच्या विजयाने प्लेऑफचे गणित बदलले; RCBसह चार संघांचे टेन्शन वाढले


मुंबई: आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पंजाब किंग्जकडून ५४ धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर देखील बेंगळुरूचा संघ गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे, पण त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अवघड झालाय. पंजाबच्या विजयाने प्लेऑफचे समीकरण आणखी क्लिष्ट झालय. आरसीबीविरुद्ध पंजाबचा पराभव झाला असता तर त्याचे आव्हान संपुष्टात आले असते. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स बाद फेरीत पोहोचली असून चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर झाली आहे.

राजस्थान-लखनौकडे संधी

लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची सहज संधी आहे. या दोन्ही संघांमध्ये अद्याप एक लढत व्हायची आहे. १५ मे रोजी होणाऱ्या या लढतीत लखनौचा विजय झाला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. राजस्थानला टॉप दोन मध्ये राहण्यासाठी शिल्लक दोन लढती जिंकाव्या लागतील. जर त्यांचा लखनौ आणि चेन्नईकडून पराभव झाला तर प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना रनरेटवर अवलंबून रहावे लागले. राजस्थानचे नेट रनरेट प्लस ०.२२८ इतके आहे.

वाचा- प्लेऑफमध्ये पोहोचण्याची स्वप्न पाहणाऱ्या KKRला झटका; पॅट कमिंन्स IPLमधून बाहेर

बेंगळुरूकडे फक्त एक मॅच

आरसीबीकडे आता फक्त एकच मॅच शिल्लक आहे. १३ सामन्यात त्यांचे १४ गुण झाले आहे. बेंगळुरूची अखेरची लढत अव्वल स्थानी असलेल्या गुजरातविरुद्ध होणार आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर संघाचे टेन्शन वाढू शकते. कारण त्यांचे नेटरनरेट वजा ०.३२३ इतके आहे आणि विजय मिळाला तर प्लेऑफमध्ये जाण्याची संधी अधिक असेल.

वाचा- IPLमध्ये डेथ रेसला सुरुवात; मुंबई-चेन्नई बाहेर आता कोणाचा नंबर, वाचा अपडेट…

दिल्ली, हैदराबाद, पंजाबसाठी संधी

पंजाबच्या विजयाने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे टेन्शन वाढवले आहे. दिल्ली, पंजाब आणि हैदराबाद या पैकी दोन संघांचे १६ गुण होऊ शकतात. पंजाबला दोन सामने खेळायचे आहेत. या लढती दिल्ली आणि हैदराबादविरुद्ध होणार आहेत. जर दोन्हीत त्यांचा विजय झाला तर दिल्ली आणि हैदराबादच्या अडचणी वाढतील. हैदराबादकडे अजून ३ लढती आहेत. पंजाब, केकेआर आणि मुंबईविरुद्ध त्यांना खेळायचे आहे. मुंबईचा संघ स्पर्धेबाहेर झाला असला तरी तो लयीमध्ये आलाय. हैदराबादने पुढील तिनही सामन्यात विजय मिळवला तर ते प्लेऑफसाठी दावेदारी दाखल करू शकतात.

वाचा- चेन्नईविरुद्ध रोहित शर्मा घाबरला होता; सामन्यानंतर सांगितले कारण…

केकेआर IPL बाहेर

कोलकात नाईट रायडर्सला अद्याप दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्हीत विजय मिळवला तर त्यांचे १४ गुण होतील. संघाचे नेट रनरेट देखील वजा आहे. ४ संघाचे आधीपासून १४ गुण आहेत. दिल्ली, पंजाब पैकी एक संघ १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचे रनरेट देखील प्लस आहे. अशात केकेआरचे स्पर्धेतील आव्हान जवळ जळव संपुष्टात आले आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पजबचय #वजयन #पलऑफच #गणत #बदलल #RCBसह #चर #सघच #टनशन #वढल

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

कैदी नवज्योतसिंग सिद्धु यांना तुरुंगात मिळतेय पंचपक्वान; एकदा यादी पाहाच

पतियाळा: सन १९८८मधील रस्त्यावरील भांडणातून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्ष सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली...

पुण्यात NCP-BJPमधील वाद गुद्द्यावर!राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

Pune Crime Latest News : पुण्यात राष्ट्रवादी-भाजपातला वाद आता गुद्द्यावर आला आहे. कारण पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अप्पा जाधव...

चमत्कार! तिसऱ्या मजल्यावरून कोसळली दीड वर्षांची चिमुकली; पण साधं खरचटलंही नाही

डेहराडून, 25 मे : काहींना चालता-बोलता, हसता-खेळता मृत्यू गाठतो तर काहींसोबत जीवघेणी दुर्घटना होऊनही त्यांना काहीच होत नाही. अशीच एक चमत्कारिक घटना सध्या चर्चेत...

PHOTO : उफ्फ तेरी अदा… ब्लॅक अँड गोल्डन ड्रेस, दीपिकाच्या लूकवर चाहते फिदा!

इंडियन प्रीमियर लीग, 2022 | क्वालिफायर 2 | नरेंद्र मोदी स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद - 27...

फक्त चवीसाठी नव्हे, कढीपत्त्याचे आरोग्यासाठी आहेत इतके फायदे; हाडांसाठी गुणकारी

नवी दिल्ली, 26 मे : कढीपत्ता (Curry leaves) हा सामान्यतः दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो. खाद्यपदार्थांना एक विशेष चव आणण्यासाठी त्याचा वापर...

Anil Parab : अनिल देशमुख प्रकरणी मुख्य तपासक Tassine Sultan यांच्याकडून अनिल परब यांची चौकशी सुरु

<p>अनिल देशमुख प्रकरणी मुख्य तपासक Tasin Sultan यांच्याकडून अनिल परब यांची चौकशी सुरु.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...