पण काय आहे तिच्या ह्या सौंदर्यामागचे रहस्य? असे का सिक्रेट उपाय आहेत जी ती आपल्या त्वचेसाठी वापरत असेल? एक तरुणी म्हणून तुम्हाला सुद्धा जाणून घेण्याची इच्छा असेलच ना? चला मग आज आपण या लेखातून शहनाज गिलच्या काही खास फॅशन टिप्स जाणून घेऊया.
ब्रेड्सची जादू

ब्रेड्स (braids) म्हणजेच केसांची घातलेली वेणी आजही एक कुल हेअर ट्रेंड म्हणून ओळखला जातो. यामुळे तुम्हाला एक कुल हिप्सटर लुक सुद्धा मिळतो. या फोटोत शहनाजने ही स्टाईल ट्राय केली आहे ती खूप बेसिक आणि सिम्पल नक्कीच आहे पण फ्रेश आणि ट्रेंडी सुद्धा आहे. शहनाजने आपल्या सरळ केसांना सेंटर पार्टिंग दिली आहे आणि मग पुढील केसांचा काही पातळ भाग घेऊन त्याची वेणी बांधली आहे. ही हेअरस्टाईल मागच्या काही काळापासून खूपच ट्रेंडीन्ग मध्ये आहे. शहनाज आपण अधिक आकर्षक दिसावं म्हणून ही हेअरस्टाईल अनेकदा वापरते.
(वाचा :- Stop Hair Fall : करीनाच्या डाएटिशियनने सांगितले केसगळती रोखण्याचे रामबाण उपाय, लागेल कायमचा फुलस्टॉप फक्त भरभरून करा ‘या’ 3 गोष्टी!)
बीची वेव्ह्ज

शहनाजला आपल्या केसांवर प्रयोग करायला खूप आवडते. ती जास्त काही क्वर्की ट्राय करत नाही पण तिच्या केसांना नेहमी कलर लावलेला आवर्जून दिसतो. सामान्यत: आपले केस मोकळे आणि सरळ ठेवणाऱ्या शहनाजने इथे मात्र आपल्या केसांना बीची व्हेव्ह्ज मध्ये स्टाईल केले आहे आणि ही स्टाईल शहनाजवर खूप जास्त सूट होते आहे. तिचे सॉफ्ट बीची व्हेव्ह्ज तिच्या सॉफ्ट ग्लॅम मेकअप लुकसह अगदी सुंदर दिसत आहेत. तुम्ही सुद्धा ही सिक्रेट हेअरस्टाईल नक्की ट्राय करून पहा.
(वाचा :- Isha Ambani Glamorous Looks : ईशा अंबानीने केली भावाच्या लग्नात ग्लॅमरस अंदाजात एंट्री, रूप असं की नवरी सोडून ईशावरच खिळल्या सर्वांच्या नजरा!)
ड्युई मेकअपची आवड

शहनाज जास्त करून आपल्या मेकअप लुक्सना फ्रेश आणि ड्युई ठेवणे पसंत करते. या लुक मध्ये तिने हायलाईटरचा वापर केला आहे जेणेकरून तिचा चेहरा हायड्रेटेड आणि ड्यूई दिसेल. डोळ्यांचे इनर कॉर्नर्स, क्यूपिड्स बो (ओठांच्या वरील अगदी मधला भाग) आणि नाकाच्या हाडावर लावला गेलेला हाईलाइटर मेकअप लुक अधिक जास्त खुलवतो. तुम्ही सुद्धा ही ट्रिक ट्राय करून आपला मेकअप लुक अधिक खास बनवू शकता.
(वाचा :- Genelia Dsouza Deshmukh : महाराष्ट्राच्या या सुप्रसिद्ध सुनबाईने समजली बदलत्या जनरेशनची टेस्ट, सिल्वर स्क्रिनवर दाखवलेल्या अदांनी चाहते घायाळ!)
पेस्टल आयशॅडो

मेकअप सोबत सुद्धा सतत नवनवीन प्रयोग करणे शहनाजला खूप आवडते. खासकरून जेव्हा ती फंकी लुक्स ट्राय करते तेव्हा नक्कीच चर्चेत येते. यात बघा तिचा पेस्टल आयशॅडो जो तिच्या लाइट परपर्ल फ्रॉकसह अजून जास्त उठून दिसतो आहे. या लुकची खासियत म्हणजे हा लुक खूप सोप्पा आहे आणि खूप कुल सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा हा लुक ट्राय करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या साधारण कार्यक्रमाला जात असाल किंवा ऑनलाईन डेट असेल तर असाच वेगळा लुक ट्राय करून पहा. हा लुक अजून जास्त बोल्ड करण्यासाठी तुम्ही ह्या आयशॅडोला काजळ आणि आयलायनर सह पेअर करू शकता.
(वाचा :- Kajol Hot Look : 40शी ओलांडलेल्या काजोलने अशी केली सौंदर्याची बरसात, ट्रान्सपरंट ब्लू अन् रेड स्लिक साडीमधील लुकने वाढवला इंटरनेटचा पारा!)
मेट लिप्स नेहमीच वाटतात कुल

शहनाज या ब्लू ऑफ-शोल्डर ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तिचे रेशमी केस आणि सोबत न्यूड पिंक शेडची मेट लिपस्टिक तिला अधिक फ्लर्टी आणि कुल लुक देत आहेत. मेट लिपस्टिक खूप फस-फ्री असते आणि याची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचा नॉन-ट्रांसफरेबल टेक्सचर होय. यांची क्वालिटी इतकी सुपर असते की तुम्ही मास्कच्या खाली सुद्धा आरामात ही लिपस्टिक लावू शकता. तर मंडळी हे आहेत शहनाज गिलचे काही ब्युटी आणि फॅशन हॅक्स, जे आजच्या तरुणींसाठी आणि ज्यांना मॉडर्न राहायला आवडते अशा तरुणींसाठी खुप जास्त उपयुक्त आहेत. तर मग नक्की वापरा आणि अधिक सुंदर दिसा. (फोटो साभार – इंस्टाग्राम)
(वाचा :- Homemade Hair Oil : ‘या’ फुलापासून बनवा घरगुती आयुर्वेदिक तेल, म्हातारपणातही केस दिसतील काळे, घनदाट व लांबसडक!)
एकदम कटरीना कैफची डुप्लीकेट!
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#पजबचय #य #हटबलड #अभनतरल #पहन #भल #भल #झल #कनफयज #फटज #बघन #तडन #नघल #ओ #तर #ह #तर #कतरन #कफ