Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट न्यूयॉर्कमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

न्यूयॉर्कमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू, आरोपी पोलिसांच्या ताब्यात


Shooting in America : अमेरिकेत जोरदार गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत. हल्लेखोर गोळीबाराचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होता. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे.

न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये अचानक गोळीबार झाला. यावेळी अनेकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूकधारी व्यक्तीने लष्करी पद्धतीचे कपडे घातले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधारी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. टॉप फ्रेंडली मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात किमान दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी जखमींची संख्या आणि स्थिती याबद्दल तत्काळ माहिती दिली नाही. 

दरम्यान, एफबीआयचे पथक संशयितांची चौकशी करत आहे. तपासकर्त्यांना संशय आहे की बंदूकधारी व्यक्तीने त्याच्या हेल्मेटवर बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण घटना लाइव्ह-स्ट्रीम केली आहे. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये तो पार्किंगमध्ये कारच्या पुढच्या सीटवर रायफल धरलेला दिसत आहे. गाडीतून उतरताच त्याने गोळीबार सुरु केला. या फुटेजमध्ये संशयित एका सुपरमार्केटमध्ये घुसून आतमध्ये अनेक लोकांना गोळ्या घालताना दिसत आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, या घटनेची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना दिली आहे. 

या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अचानक असा गोळीबार झाल्याने तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या गोळीरात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी गोळीबार करण्याऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#नययरकमधय #अदधद #गळबर #जणच #मतय #आरप #पलसचय #तबयत

RELATED ARTICLES

‘हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!’ नव्या मालिकेमुळे अभिजीत खांडकेकर ट्रोल

मुंबई, 26 मे:  'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Maziya Priyala Preet Kalena) मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे 'अभिजीत खांडकेकर' (Abhijeet...

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

Most Popular

Top Smartphones: ‘या’ प्रीमियम स्मार्टफोन्सचा भारतात धुमाकूळ, फास्ट प्रोसेसरसह भन्नाट फीचर्सने जिंकली युजर्सची मनं

Premium Smartphones in India: तुम्ही स्मार्टफोनमध्ये ४० हजार रुपये गुंतवण्यास तयार असाल, तर तुम्ही नक्कीच एका ऑल राउंडर फोनच्या शोधात असाल . ज्यामध्ये...

Realme Smartphone: रियलमीच्या पॉवरफुल ५जी स्मार्टफोनचा आज पहिला सेल, ४८MP कॅमेऱ्यासह मिळेल दमदार फीचर्स; पाहा किंमत

नवी दिल्ली :Realme Narzo 50 Pro 5G Sale: Realme ने आपला दमदार स्मार्टफोन Narzo 50 Pro 5G ला गेल्यावर्षी भारतात लाँच केले होते....

पांढरे केस तोडल्याने आणखी वाढतात?, काय आहे यामागील सत्य

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, पांढरे केस तोडल्याने आणखी वाढू लागतात, पण यात काही तथ्य आहे का? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

PM Kisan Yojana: सरकार लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा करणार २ हजार रुपये, मात्र त्याआधी करा ‘हे’ महत्त्वाचे काम

नवी दिल्ली :PM Kisan Yojana 11th Installment: केंद्र सरकारद्वारे गरीब, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक पंतप्रधान किसान सन्मान निधी...

रजत पाटीदार नव्हे तर RCBच्या विजयाचा खरा हिरो ठरला फिल्डर; पाहा व्हिडिओ

कोलकाता: आयपीएलच्या एलिमेनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत एक वेळ अशी होती की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव होईल असे वाटत होते. संघातील मुख्य...

LSG vs RCB: विराटला बाद केल्यानंतर आवेश खाननं केलेली ‘ती’ कृती चर्चेत; Viral Video वरुन दोन गट, पाहा नेमकं घडलं काय | IPL 2022...

आयपीएलच्या २०२२ च्या पर्वामधील पहिल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊ सुपर जायंट्सवर १४ धावांनी विजय मिळवला. रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२)...