हायलाइट्स:
- सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक
- नीरजचे कौतुक करताना अमिताभ बच्चन यांनी केली चूक
- अमिताभ बच्चन यांची चूक दाखवत युझर्सनी केले ट्रोल
अमिताभ बच्चन यांनी काय केले होते ट्वीट
अमिताभ बच्चन यांनी एक अॅनिमेटेड व्हिडिओ आपल्या ट्वीटमध्ये शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी भारतीय ऑलिम्पिक टीमचे कौतुक केले होते. त्यांनी लिहिले की, ‘एका व्यक्तीच्या छातीने १०३ कोटी लोकांची छाती अभिमानाने फुलवली आहे. भारतीय ऑलिम्पिक टीमने जगामध्ये देशाचा झेंडा फडकवला आहे.’
अमिताभ बच्चन यांनी या ट्वीटमध्ये भारताची लोकसंख्या १३० कोटी ऐवजी १०३ कोटी लिहिली. यावरून युझर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझर्सने लिहिले की, ‘यांचे अर्धे आयुष्य चुका सुधारण्यातच जाणार आहे.’ अन्य एका युझरने लिहिले, ‘१०३ कोटी?? हे ज्ञान तुम्हाला कोणत्या विद्यापीठामध्ये मिळाले आहे. अंधभक्तीमध्ये २७ कोटी जनतेला तुम्ही नायजेरियाला पाठवून दिले.’
अन्य एका युझरने लिहिले आहे की, ‘१४२ कोटी लोकसंख्या आहे देशाची… २०११ मध्ये झालेल्या जनगणेच्या आकडेवारीमध्ये वाढणारी लोकसंख्या मिळवा.’ आणखी एका युझरने लिहिले, ‘ सर तुम्हाला देशाबद्दल इतके प्रेम असेल तर सुशांतसिंह राजापूत केसमध्ये पुढे येऊन बोला की…’
अमिताभ बच्चन यांनी चूक सुधारली
सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपली चूक सुधारली. ही चूक सुधारण्यासाठी त्यांनी आणखी एक ट्वीट केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले, ‘चूक सुधारली १३० कोटी’
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचे तर आयुष्मान खुरानासोबत ते ‘गुलाबो सिताबो’ या सिनेमात दिसले होते. बिग बींच्या आगामी सिनेमांमध्ये चेहरे, झुंड, मेडे लवकरच प्रदर्शित होतील. तसेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सोबतचा ब्रह्मास्त्र सिनेमातही ते दिसणार आहेत. सध्या अमिताभ बच्चन ‘गुडबाय’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता दिसणार आहेत. त्याशिवाय ते दीपिका पादुकोणसोबत हॉलिवूड फिल्म ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#नरज #चपरसठ #टवट #करन #अमतभ #झल #टरल #यझरस #महणल #चक #सधरणयतच #आयषय #जणर