Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या निर्यातक्षम भेंडी उत्पादन

निर्यातक्षम भेंडी उत्पादन


संतोष मासोळे
राज्य शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर धुळे तालुक्यातील २०० प्रयोगशील शेतकऱ्यांनी १०० हेक्टर क्षेत्रात निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन घेतले. धुळ्यातील या भेंडीने युरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलँड या देशातील बाजारपेठाही गाजविण्यास सुरुवात के ली आहे.

धुळे तालुक्यातील २०० प्रयोगशील शेतकऱ्यांनी १०० हेक्टर क्षेत्रात निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन घेतले असून या स्थानिक पिकाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठाही गाजविण्यास सुरुवात के ली आहे. राज्य शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित हा प्रयोग राबविला गेला. धुळ्यातील भेंडीने युरोप, जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलँड या देशात आपली गुणवत्ता सिद्ध केली. या माध्यमातून स्थानिक पातळीवर निर्यातक्षम भेंडी उत्पादनास चालना मिळाली आहे.

भेंडी ही तशी बहुतांश घरातील दैनंदिन वापरातील भाजी. स्थानिक बाजारात अन्य भाज्यांप्रमाणे तिला भाव मिळतो. गुणवत्तापूर्ण भेंडी उत्पादित करून ती निर्यात करण्याचा संकल्प धुळे तालुक्यात प्रत्यक्षात आला. धुळे जिल्ह्यात बहुतेक भागात भेंडी हे खरीप हंगामात घेतले जाणारे मुख्य भाजीपाला पीक आहे. यात धुळे तालुका हा खास निर्यातक्षम भेंडीत अग्रेसर होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात जवळपास ३०० हेक्टर क्षेत्रात भेंडी हे पीक घेतले गेले. धुळे तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी पहिल्याच प्रयोगात निर्यातक्षम भेंडी उत्पादनाचे आव्हान लीलया पेलले. भेंडीच्या उत्पादनासाठी स्थानिक शेतकरी पुन्हा एकदा सरसावले आहेत. कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या संकल्पनेतून मंडळ कृषी अधिकारी प्रभावती पाटील यांनी पिंपरी मंडळात हा प्रकल्प राबविला. खोरदड, मोरदड, पुरमेपाडा, सोनेवाडी आणि आर्वी या गावात १०० हेक्टर क्षेत्रात भेंडीची लागवड करण्यात आली. तत्पूर्वी शेतकऱ्यांना नियोजनपूर्वक पद्धतीचे लाभ लक्षात आणून देण्यात आले. पिकासाठी महिको कंपनीचे प्रचलित आणि निर्यातक्षम वाण वापरण्यात आले.

बाजारातील मागणी विचारात घेऊन पीक उत्पादनाचे नियोजन हे या प्रयोगाचे वैशिटय़ आहे. भौगोलिकदृष्टय़ा वैशिष्टय़पूर्ण पिकाची बाजारपेठेत ओळख निर्माण करणे, शेतकऱ्यांना खरेदीदार आणि प्रक्रिया प्रकल्पाशी जोडणे, भेंडी पिकाची मूल्यसाखळी विकसित करणे, भविष्यात उत्पादित होणारा भेंडी हा ‘ब्रँड’ तयार करणे ही या संकल्पनेची उद्दिटय़े साध्य करण्याच्या दिशेने काम सुरू झाले.

वापरलेले वाण जमिनीसाठी कसदार ठरले. परिसरात हिरवीगार, लांब आणि चकाकी असलेली भेंडी लक्ष वेधू लागली. ४५ ते ९० दिवसात येणारे पीक चवीला रुचकर असल्याची खात्री झाली. हेक्टरी २० ते २५ टन उत्पादन क्षमता सिद्ध केलेला प्रकल्प पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आकर्षित करणारा ठरला. सर्वसाधारणपणे १५ जून ते १५ जुलै आणि १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत भेंडीची लागवड करता येऊ  शकते. लागवडीचे अंतर तीन बाय १५ सेंटीमीटर असून हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे वापरणे अपेक्षित आहे. द्रवरूप कॉन्सशिया (ऑझटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे विषाणू) अशी बीज प्रक्रिया करण्यात आली. लागवडीनंतर दोन आठवडय़ांनी रोपांची विरळणी करणे गरजेचे ठरते. सहा ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकातील तणाची खुरपणी, नंतर पिकास मातीची भर अशी आंतर मशागत उपयुक्त ठरते.

प्रकल्पात शेतकऱ्यांना निविष्ठा संच देण्यात आले. त्यामध्ये महिको प्रति एकरी चार किलो बियाणे, लिक्विड रशिया १५० मिली, झिंक सल्फेट आठ किलो, फेरस सल्फेट आठ किलो, युरिया ५० किलो, डेल्टामेथ्रीन एक लिटर, कोळपणी, तोडणी, प्रतवारी, पॅकिंग, ट्रायकोडर्मा यांचा अंतर्भाव होता. प्रति लाभार्थी ३२ हजार ३१० रुपयांचा निविष्ठा संच होता. शेतकरी ते कृषी विभाग आणि कृषी विभाग ते निर्यातदार कंपनी असे विक्री व्यवस्थापन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी प्रभावती पाटील यांनी निर्यातक्षम भेंडी उत्पादन आणि वेग नेट प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांनी नोंदणी करून उत्पादनास खरेदीदारांकडून हमीभाव निश्चित केल्याचे नमूद केले. शाश्वत उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत शासनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर उत्पादित भेंडी जगाच्या बाजारपेठेत निर्यात होत आहे.

रोगापासून बचाव

रस शोषण करणारे किडे, तुडतुडे, पांढरी माशी, मावा यांच्यावर इलाज करता येतो. स्टीकी ट्रप्स, निंबोळी अर्काची फवारणी, व्हर्टिसिलियम लॅकेनी, डायमेथोएट ही औषधी वापरण्यास कृषी विभागाने सुचविले. शेंडे आणि फळ पोखरणारी अळी यांसारख्या संकटांवरही मात करता येते. किडलेली भेंडी तोडून नष्ट करावी. क्लिनॉलफॉस, बिव्हेरिया बासियाना, बीटी, येल्टामेथ्रीन, ट्रायकोकार्ड, कामगंध साफळे अशी तजवीज करता येईल. भेंडी वरील प्रमुख रोग व व्यवस्थापन करण्यासाठी भुरी ८० टक्के गंधकाची २० ते २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात फवारणी करावी किंवा ३०० मेष गंधकाची धुरळणी करावी. पानावरील ठिपके घालविण्यासाठी कॉपर ओक्झिक्लाराईडची फवारणी सुचविण्यात आली आहे. या शिवाय ०.२५ टक्के मॅन्कोझेब फवारणीही करावी.

लागवडीपासून साधारणपणे ४० ते ४५ दिवसात भेंडीला फु ले येण्यास सुरुवात होते. त्यानंतर आठवडाभरात फळे लागण्यास प्रारंभ होतो. साधारणत: ५५ ते ६० दिवसांनी फळे तोडण्यास तयार होतात. दर तीन ते चार दिवसांनी फळे काढणीस येतात. उत्तम फळांसाठी दिवसाआड तोडणी महत्त्वाची ठरते. भेंडी तोडणी सकाळी किंवा सायंकाळी करावी लागते. त्यामुळे भेंडीचा ताजेपणा, रंग जास्त काळ टिकून राहतो. काढणीनंतर ती सावलीत ठेवणे आवश्यक आहे. तोडणीवेळी हातमोजे वापरल्याने लव टोचत नाही. कात्रीचा वापर केल्यास नेहमीच्या तुलनेत दुप्पट काम होते.

पीक कालावधी ११० ते १२० दिवसांचा आहे. हेक्टरी उत्पादन ९० ते १०० क्विंटल येऊ  शकते.  पिवळी, वाकडी आणि कीडग्रस्त फळे काढून टाकावी लागतात. फळे सहा ते नऊ  सेंटीमीटर लांब, गडद हिरवा रंग, लुसलुशीत अशा निर्यातक्षम फळांचे वजन सरासरी १५ ग्रॅम असावे लागते. प्रतवारी करताना फळांना इजा अथवा डाग नाही याकडे लक्ष द्यावे लागते. प्रतवारीनुसार एका खोक्यात दोन किंवा चार किलो भेंडी वेष्टित करण्यात आली.

नफा-तोटय़ाचे समीकरण

या प्रयोगात प्रति हेक्टरी २०३ क्विंटल उत्पादन अपेक्षित होते. बाजार भाव २४०० रुपये प्रतिक्विंटल मि़ळाला. प्रकल्पांतर्गत भेंडीचे एकूण २० हजार ३०० क्विंटल उत्पादन झाले. प्रति हेक्टर ८० हजार ७७५ रुपये खर्च आला. प्रकल्पाचा एकूण खर्च ८० लाख ७७ हजार रुपये होता. यातून एकूण ४८७.२० लाख उत्पन्न मिळाले. नफा ४०६ लाख ४३ हजार रुपये मिळाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 3, 2021 1:47 am

Web Title: 200 experimental farmers in dhule taluka produce exportable lady finger in 100 hectare area zws 70

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#नरयतकषम #भड #उतपदन

RELATED ARTICLES

Skin Care Tips – त्वचेवर नैसर्गिक तेज आणण्यासाठी उपयुक्त असते काळी वेलची, असा कर

मुंबई, 13 ऑगस्ट : काळ्या वेलचीच्या वापरामुळे जेवणाची चव तर वाढतेच मात्र जर तुम्ही चहाचे शौकीन असाल. तर चहामधील वेलचीचा सुगंध नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध...

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Most Popular

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

भारतीय महिला बुद्धिबळपटूंची प्रगती अधोरेखित!; ऑलिम्पियाडमधील पहिल्या पदकाबाबत प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचे मत

अन्वय सावंत मुंबई : गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई...