Monday, July 4, 2022
Home भारत नाशिक जिल्ह्यातील 31 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित, नांदगावमध्ये शेतकऱ्यांची अधिक फसवणूक

नाशिक जिल्ह्यातील 31 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित, नांदगावमध्ये शेतकऱ्यांची अधिक फसवणूक


Nashik News : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले होते. तरी देखील कृषी सेवा केंद्र संचालकांनी विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे गुणवत्ता नियंत्रण विभागाने जिल्ह्यातील 31 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे व कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी दिली.

कृषीमंत्र्यांचा दणका

दरवर्षीप्रमाणे यंदाही कृषी सेवा केंद्राकडून खते बी-बियाणे खरेदी करताना फसवणूक होत असल्याचे आढळून आले आहे. या स्पर्श कृषी विभागाने संबंधित विक्रेत्यांना दणका देत जिल्ह्यातील 31 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांनी खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्याकरीता तसेच खतासाठी व बियाण्यांसाठी त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कडक कारवाईचे आदेश कृषी विभागाला दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक

जिल्ह्यात ठिकठिकाणी खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरूवात झाली असून बी बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशातच जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. खरीप हंगामाच्या आधीच कृषी विभागाने सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांना शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना मागणीनुसार खतांची विक्री करावी, त्यासाठी इतर उत्पादने घेण्याचे बंधन करू नये, खतांची विक्री ई पॉस मशिनच्या माध्यमातून करावी, विक्री व शिल्लक साठी यांची नोंद ठेवावी, अशा सूचना दिल्या होत्या. 

गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून दुकानांची तपासणी

दरम्यान या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने याबाबत दुकानांची तपासणी केली असता ई पॉस मशिनवरील नोंदीनुसार शिल्लक साठा व प्रत्यक्ष गुदामातील साठा याचा ताळमेळ नसल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे दुकानाबाहेर साठा व भावफलक न लिहिणे, खते, औषधे विक्रीनंतर शेतकऱ्यांना पक्के बील  न देणे, युरियाची विक्री केवळ अधिक खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच करणे आदी अनियमितता आढळून आली.
  
31 विक्रेत्यांचे परवाने निलंबित
जिल्हा कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, अभिजित घुमरे जिल्हा भरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करीत आहेत. यामुळे या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात 31 विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले असून त्यात 18 खते विक्रेते, 6 बियाणे विक्रेते व 7 किटकनाशक विक्रेते असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#नशक #जलहयतल #कष #सव #कदरच #परवन #नलबत #नदगवमधय #शतकऱयच #अधक #फसवणक

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...