Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा

नाक, तोंड नाही तर शरीराच्या ‘या’ अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा


मुंबई, 22 जून: मानवी शरीराची रचना वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. शरीरातल्या प्रत्येक अवयवाची (Organ) कार्यपद्धती असते. त्यामुळे एखादा अवयव दुखावला किंवा काही कारणांमुळे त्याच्या कार्यप्रणालीत अडथळा आला तर त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसतो. श्वसन प्रणाली (Respiratory system) ही सर्वात नाजूक मानली जाते. कारण श्वसनात कोणत्याही कारणामुळे अडथळा निर्माण झाला तर प्रसंगी माणसाचा मृत्युदेखील होऊ शकतो. याच श्वसन प्रणालीच्या अनुषंगाने नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत. माणूस गुदद्वाराने (Anus) देखील श्वास घेऊ शकतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे. या संशोधनात कासव, डुक्कर आणि उंदराच्या शरीर रचनेचा अभ्यास करण्यात आला. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे.
मानवी श्वसन यंत्रणेबाबत नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. त्यात माणूस गुदद्वारानेही श्वास घेऊ शकतो, असं दिसून आलं आहे. हे संशोधन सायन्स डायरेक्टनं (Science Direct) केलं असून, ते MED जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. यासाठीच्या अभ्यासादरम्यान संशोधकांच्या एका पथकानं कासवांच्या (Tortoise) संथ चयापचय प्रक्रियेवर आधारित, तसंच डुक्कर (Pig) आणि उंदरांवर (Rat) अनेक प्रयोग केले. या प्रयोगांमधून ही अनोखी बाब समोर आली आहे.

हेही वाचा – पावसळ्यातही उजळेल तेलकट चेहरा, ‘या’ सोप्या उपायांची करा अंमलबजावणी
या अभ्यासादरम्यान, म्युकोसल लायनिंग (Mucosal Lining) अर्थात अस्तर पातळ करण्यासाठी प्राण्यांची आतडी स्वच्छ करण्यात आली. ज्यामुळे रक्तप्रवाहातील अडथळा कमी झाला. त्यानंतर जनावरांना ऑक्सिजन नसलेल्या खोलीत ठेवण्यात आलं. कासवांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट थरांमुळे ते त्यांच्या गुदद्वाराने श्वास घेऊ शकतात आणि यामुळे ते हिवाळ्यातही जिवंत राहू शकतात असं या संशोधनात लक्षात आलं. यात पुढं असं दिसून आलं की, ज्या प्राण्यांची आतडी स्वच्छ केली गेली होती आणि त्यांना दबावाखाली ऑक्सिजन (Oxygen) मिळाला, त्यापैकी 75 टक्के प्राणी एक तासापर्यंत जिवंत राहिले.
यादरम्यान, ज्या प्राण्यांचा श्वास रोखून धरला गेला, त्यांची आतडी व्हेंटिलेशनपासून वंचित होती असे 11 प्राणी नंतर मृत्युमुखी पडले. या व्यतिरिक्त आतड्यांसंबंधी शुद्धीकरण न करता आतड्यांना व्हेंटिलेशन (Ventilation) मिळालेले प्राणी सुमारे 18 मिनिटांपर्यंत जिवंत राहिले. यावरून असं दिसून आलं की त्या ठिकाणाहून थोडा ऑक्सिजन आत घेतला जात होता. उंदीर आणि डुक्कर योग्य परिस्थितीत आतड्यांच्या माध्यमातून श्वास घेण्यास सक्षम आहेत, असं यावरून सिद्ध होतं. याचाच अर्थ गुदद्वाराने श्वास घेणंही शक्य असल्याचं सायन्स डायरेक्टनं केलेल्या एका संशोधनात दिसून आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#नक #तड #नह #तर #शररचय #य #अवयवनह #घऊ #शकत #शवस #सशधकच #दव

RELATED ARTICLES

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण...

Most Popular

शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न

रायपूर, 02 जुलै : असे बरेच तरुण आहेत ज्यांचं काही ना काही कारणामुळे लग्न होत नाही आहे. वय वाढत जातं पण लग्नासाठी मुलगी...

उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल

जयपूर 02 जुलै : प्रेषित पैगंबरांच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ उदयपूरमधील एका हिंदू टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली (Udaipur Tailor Murder Case). याप्रकरणी...

Wrong Fruit Combination : सावधान, फळांसोबत ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास पोटात बनतं विष, चुकूनही एकत्र खाऊ नका, जीव येईल धोक्यात..!

फळे ही अशी गोष्ट आहे जी पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी आणि शक्तिशाली गोष्ट मानली जाते. आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजे...

मुख्यमंत्री म्हणजे शेतात राबणारा एक ‘रांगडा’ गडी! एकनाथ शिंदेंचे गावातील पैलू

CM Eknath Shinde Exclusive : महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...

दहा दिवसानंतर एलॉन मस्क पुन्हा ट्विटरवर सक्रिय; शेअर केले ‘हे’ ट्वीट्स

Elon Musk on Twitter : टेस्ला कंपनीचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात....

Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

Eye Care Tips : पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला...