Saturday, August 13, 2022
Home करमणूक नवीन घराचं काम पाहायला रणबीर नव्हे, तर आलियासोबत आल्या नीतू...

नवीन घराचं काम पाहायला रणबीर नव्हे, तर आलियासोबत आल्या नीतू कपूर


हायलाइट्स:

  • कृष्णा राज बंगल्यातील दुरुस्तीचे काम बघायला आली आलिया भट
  • भावी सासू, नीतू कपूरची घेतली गळाभेट
  • नितू आणि आलियाने मिळून केली कामाची पहाणी

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांचेही लवकरच शुभमंगल होण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या वर्षाअखेरीपर्यंत या दोघांचे लग्न होणार असल्याचे सांगितले जात आहे. लग्नानंतर आलिया आणि रणबीर त्यांच्या वाडवडिलांचया कृष्णाराज बंगल्यामध्ये राहणार आहेत. त्यामुळे काही महिन्यांपासून या बंगल्याच्या रिकंस्ट्रक्शन आणि रिनोवेशन चे काम सुरू आहे. हे काम कसे चालले आहे, ते पाहण्यासाठी बुधवारी आलिया भट तिच्या होणा-या सासूसह म्हणजे नितू कपूरसह आली होती.

AssignmentImage-1002815483-1628086721

आलिया नितूची गळाभेट

आलिया आणि नितू कपूर दोघीजणी वेगवेगळ्या गाड्यांमधून वांद्रे येथील कृष्णा राज बंगल्यामध्ये आल्या. ज्यावेळी या दोघीजणी एकमेकींच्या समोर आल्या, तेव्हा आलियाने होणा-या सासूची अतिशय प्रेमाने गळाभेट घेतली. त्यानंतर त्या दोघीजणी आतमध्ये गेल्या. दरम्यान, गेल्याच महिन्यामध्ये आलिया आणि रणबीर दोघेजण घराचे काम पाहण्यासाठी आले होते. मात्र, आज या दोघींबरोबर रणबीर नव्हता. सध्या रणवीर दिल्लीमध्ये त्याच्या आगामी लव रंजन सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर देखील दिसणार आहे.

AssignmentImage-1306243291-1628086721

आलियाला येतेय रणबीरची आठवण

रणबीर चित्रीकरणाच्या निमित्ताने दिल्लीत असल्याने आलिया भट सध्या मुंबईत एकटीच आहे. त्यामुळे आलियाला रणबीरची खूप आठवण येत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून रणबीरला मिस करत असल्याचे सांगितले होते. ही पोस्ट शेअर करताना तिने रणबीर कपूरची टोपी घातली होती. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले होते, ‘जेव्हा तुम्ही त्याला मिस करता तेव्हा त्याच्या वस्तू तुम्ही चोरता…’

ऋषी कपूरच्या निधनामुळे लग्न पुढे ढकलले
गेल्या अनेक महिन्यांपासून रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. परंतु अद्याप दोघांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी ऋषी कपूर यांच्या निधनाच्या आधी देखील या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. परंतु ३० एप्रिल २०२० ला ऋषी कपूर यांचे निधन झाल्यानंतर या दोघांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.

ब्रह्मास्त्र सिनेमा रिलीज होण्याआधी होणार लग्न
रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी यांचा हा सिनेमा असून तो प्रदर्शित होण्याआधीच रणबीर आणि आलियाचे लग्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमात आलिया, रणबीर व्यतिरीक्त अमिताभ बच्चन, डिम्पल कपाडिया, मौनी रॉय आणि नागार्जुन प्रमुख भूमिकेत आहेत.

आलियाचे आगामी सिनेमे

AssignmentImage-471704990-1628086722

आलिया भटच्या कामाबद्दल सांगायचे तर तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. त्यामध्ये एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमातही आलिया दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाही प्रदर्शनासाठी तयार झाला आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने स्वतःच्या निर्मिती संस्थेचही घोषणा केली होती. तिच्या संस्थेतर्फे ‘डार्लिंग्ज’ या पहिल्या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवातही झाली असून विजय वर्मा आणि शेफाली शाह यांच्या चित्रीकरणाला प्रारंभही झाला आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#नवन #घरच #कम #पहयल #रणबर #नवह #तर #आलयसबत #आलय #नत #कपर

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची...

Salman Rushdie attack : सलमान रश्दींवर अमेरिकेत जीवघेणा हल्ला, गळ्याजवळ चाकूनं सपासप वार

न्यूयॉर्क : भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील बफेलोमध्ये चौटाउक्वामध्ये एका व्याख्यानावेळी चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सलमान रश्दी यांची ओळख करुन...

रूक्ष केसामुळे चितेंत आहात? ‘हे’ घरगुती ठरतील फायदेशीर

आजकाल स्त्रिया केसांना मुलायम, सरळ करण्यासाठी हेअर ट्रीटमेंट घेतात पण ते खूप महाग असते अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Anjali Arora Leaked Video : लीक झालेल्या एमएमएस व्हिडिओवर अंजली अरोरा म्हणाली…

Anjali Arora Leaked Video : सोशल मीडिया इन्फ्लुएंझाजर ते टीव्ही असा प्रवास करणाऱ्या अंजली अरोरा (Anjali Arora) या...

छत्रपतींच्या पुतळ्याची सुटका कधी? पुतळा तीन वर्षांपासून तयार, पण सीएसटीवर कधी विराजमान होणार?

<p><strong>मुंबई:</strong> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव असलेल्या स्थानकावर छत्रपतींचा भव्य पुतळा असावा अशी मागणी केली गेली. त्यानंतर तज्ञांशी सल्लामसलत करून जेजे स्कूल ऑफ...