Sunday, January 16, 2022
Home टेक-गॅजेट नवीन कोरोना व्हायरस 'चिंतेचा', WHOनं दिलं 'हे' नाव, धोका अधिक!

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!


Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय “चिंतेचा” ( concern) असल्याचे घोषित केले आहे. या नव्या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन (B.1.1.529) असे नाव दिले आहे. ओमिक्रॉन हा धोकादायक व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होतो . याशिवाय सुरुवातीच्या पुराव्यांवरून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ग्रीक वर्णमालानुसार या विषाणुला ओमिक्रॉन असं नाव दिलेय. याआधीच्या कोरोना व्हेरिएंटला अल्फा, बिटा, गामा, डेल्टा, कप्पा यासारखी नावे दिली आहेत. त्यानुसार, दक्षिण आफ्रिकामध्ये (Corona Virus South Africa Variant) आढळलेल्या या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.  

24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनं केली. त्यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्ये देखील हा नवीन व्हेरिएंट आढळला.  नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून बर्‍याच देशांनी आता दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी किंवा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.  दक्षिण आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, बोत्सवाना, लेसोथो आणि इस्वाटिनी येथील प्रवासी यूके किंवा आयरिश नागरिक किंवा यूकेचे रहिवासी असल्याशिवाय यूकेमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेनं देशांना काय सुचना केल्यात?

नवीन कोरोना व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक प्रमाणात म्युटेट होतोय. या व्हेरिएंटचं म्युटेशन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास कऱणं गरचेचं आहे. त्याच्या म्युटेशनवर लक्ष ठेवावे. तसेच कशापद्धतीने तो आपलं म्युटेशन करतेय ते पाहावे.
GISAID सारख्या सार्वजनिकरीत्या उपलब्ध डेटाबेसवर संपूर्ण जीनोम अनुक्रम आणि संबंधित मेटाडेटा जागतिक आरोग्य संघटनेकडे जमा करावा. 
IHR यंत्रणेद्वारे व्हीओसी संसर्गाशी संबंधित सुरुवातीची अथवा समूह संपर्काची प्रकरणे जागतिक आरोग्य संघटनेला तात्काळ कळवावीत.
जिथं मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे किंवा वर्दळीची ठिकाणं आहेत तिथं सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय, निदान पद्धती,  रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे उपाय यामध्ये सुधार आणणं गरजेचं आहे. सोबतच तिथल्या प्रयोगशाळांचंही मूल्यांकन करणं गरजेचं आहे.

हा व्हेरिएंट किती धोकादायक?
जगभरातील तज्ज्ञ या प्रकाराला मोठा धोका मानत आहेत. तज्ज्ञांच्या मते, B.1.1529 व्हेरिएंटमध्ये इतर व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त वेगाने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, इंम्पिरिअल कॉलेज लंडनचे विषाणू तज्ज्ञ डॉ. टॉम पीकॉक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हायरसच्या नवीन प्रकाराविषयी माहिती दिली. ते म्हणाले की जगातील प्रमुख डेल्टा स्ट्रेनसह इतर कोणत्याही प्रकारापेक्षा हा व्हेरिएंट अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे.

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना किती धोका?
जगभरात विकसित झालेल्या बहुतेक कोविड लसींचा हल्ला फक्त स्पाइक प्रोटीनवर होतो.  स्पाइक प्रोटीनमध्ये 32 उत्परिवर्तन असल्याने, लशीला प्रभावहीन करण्यास हा व्हेरिएंट सक्षम आहे. हाँगकाँगच्या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचा डोस घेतला होता, तरीही त्यांना संसर्ग झाला. हा नवा व्हेरिएंट लशीचा प्रभाव संपुष्टात आणण्यास सक्षम असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. 

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार हवेतून पसरतो का?
हाँगकाँगमध्ये सापडलेल्या नवीन प्रकारातील दोन्ही रुग्णांना फायझरची कोरोना लस घेतली होती. हे रुग्ण आफ्रिकेतून परतले  होते. त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या नमुन्यांच्या तपासणीत विषाणूचे प्रमाण खूप जास्त आढळून आले. त्यामुळेच नवीन प्रकार हवेतून पसरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आज आपल्या धोक्याचा विचार करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती.

नवीन व्हेरिएंटबाबत जगात काय चर्चा सुरू?
B.1.1.529 प्रकाराबाबत संपूर्ण जग सावध झाले आहे. आफ्रिकन देशांची उड्डाणे थांबवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इस्रायलने सात आफ्रिकन देशांच्या प्रवासावर निर्बंध लादले आहेत. इस्रायल सरकारने दक्षिण आफ्रिका, लेसेथो, बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझांबिक, नामिबिया आणि इस्वाटिनी या देशांचा ‘रेड लिस्ट’मध्ये समावेश केला आहे. त्याच वेळी, ब्रिटनने सहा आफ्रिकन देशांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. सरकारने या देशांची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. त्याचबरोबर सिंगापूरनेही आफ्रिकन देशांमध्ये जाणारी विमान सेवा स्थगित केली आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#नवन #करन #वहयरस #चतच #WHOन #दल #ह #नव #धक #अधक

RELATED ARTICLES

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

‘ कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची…’ किरण मानेंचा निर्मात्यांवर गंभीर आरोप

मुंबई,16 जानेवारी-  गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते किरण माने   (Kiran Mane)  प्रचंड चर्चेत आहेत. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali...

सत्ता येताच मोफत वीज-पाणी-शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये, केजरीवालांची घोषणा

पणजी, 16 जानेवारी : पाच राज्यांच्या निवडणुकांची (5 states assembly election 2022) रणधुमाळी सुरू झाली असून गोव्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय...

Most Popular

सिंधूचे आव्हान संपुष्टात

पुरुषांमध्ये लक्ष्य एकेरीच्या, सात्त्विक-चिराग दुहेरीच्या अंतिम फेरीत वृत्तसंस्था, नवी दिल्ली दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या भारताच्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत...

लसीचे दोन डोस घेतले असतील तरच लोणावळ्यासह मावळ तालुक्यात मिळणार प्रवेश, अन्यथा….!

Pune Corona Restrictions : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात (Lonavala) लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश...

Deepveer जोडी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट, क्यूट कपलला पाहून फॅन्स म्हणाले…

मुंबई, 16 जानेवारी: बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण(Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh )सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दोघंही त्यांचा हटके...

Trolling नंतर नवीन गाणं रिलीज होताच गोविंदानं केला कमेंट सेक्शन ऑफ !

मुंबई, 15 जानेवारी- बॉलिवूडचा हिरो नंबर 1 म्हणून अभिनेता गोविंदाला ओळखले जाते. गोविंदाने 13 जानेवारीला ‘मेरे नाल’ (Govinda new song Mere Naal) हे...

‘लोकशाहीच्या आरशा’त मुद्दे दिसतील?

योगेन्द्र यादव पाच राज्यांतील निवडणुकांची घोषणा आता झाली, पण तात्कालिक प्रचारातून मतदारांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न तर त्याआधीच सुरू झाले होते! ही निवडणूक राज्यांमध्ये असली...

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...