Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या नवं सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, शिंदे गटाची कोर्टात धाव

नवं सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, शिंदे गटाची कोर्टात धाव


मुंबई, 24 जून : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला निर्णायक वळण लागलं आहे. महाविकास आघाडी सरकार हटवून नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय. सध्या सुरू असलेल्या वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यामागे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शिंदे समर्थक आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने या आमदारांविरोधात कारवाईचा प्रयत्न सुरू केला आहे. व्हिपनंतरही बैठकीला उपस्थित न राहिलेल्या आमदारांना अपात्र ठरवणार असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. आत्तापर्यंत एकूण 17 शिवसेना आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी विधानसभेच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पवारांनी खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आऊट करण्याचा पवारांचा प्लॅन आहे.शिवसेनेतीस शिंदे समर्थक आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावे लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्लॅन आहे.
महाविकास आघाडी सरकारचा हा प्लॅन उधळून लावण्यासाठी शिंदे गटानं आता मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय. त्यामुळे या प्रकरणात आता पुढील घडामोडींचं केंद्र विधानभवानाप्रमाणेच मुंबई हायकोर्ट हे देखील राहणार आहे. शिंदे गटानं यापूर्वीच शिवसेनेच्या मागणीनंतरही समर्थक आमदार अपात्र होणार नाहीत, असा दावा केला आहे. हाच दावा या गटाकडून हायकोर्टात मांडला जाईल.
नवं सरकार किंवा पुन्हा निवडणूक? राज्यातील सत्तासंघर्षात आता फक्त 2 पर्याय शिल्लक
आमच्याकडे 40 शिवसेना आमदार आणि 12 अपक्ष आमदार आहेत. अशात अल्पमतात असताना गटनेता बदलता येत नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आमदारांना अपत्रा ठरवण्याबाबतच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की बैठकीला हजर नाही म्हणून एखाद्याला अपात्र ठरवणं हे हस्यास्पद आणि बेकायदेशीर आहे. याचा कोणताही परिणाम आमदारांवर होणार नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#नव #सरकर #सथपनचय #हलचलन #वग #शद #गटच #करटत #धव

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

Most Popular

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...

आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये...

वय वर्ष फक्त 5; तिने केला हा कारनामा अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

इंदूर, 3 जुलै : वयाच्या 5 व्या वर्षी मुलं शिक्षणाची (Education) पहिली पायरी व्यवस्थित चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इंदूरची कन्या वन्या मिश्राने (Vanya...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...