बर्लिन: करोना महासाथीचा आजार पुन्हा एकदा जोर धरत आहे. जगातील अनेक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण वेगाने केले जात आहे. जर्मनीतही करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र, एक धककादायक प्रकार समोर आला आहे. लसीकरणादरम्यान एका नर्सने तब्बल ८६०० जणांना लशीऐवजी मिठाचं पाणी दिल्याचे समोर आले आहे.
उत्तर जर्मनीत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मार्च-एप्रिल महिन्यात देण्यात आलेल्या लसीकरणा दरम्यान हा गोंधळ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दरम्यान लसीकरण झालेल्यांना करोनाची बाधा होण्याचा अधिक धोका असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या नागरिकांनी पुन्हा एकदा लशीचा डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करोना, इबोलासारखा आणखी एक घातक विषाणू; WHO ने दिली माहिती नर्सने ८६०० जणांना लशीऐवजी मिठाचं पाणी (स्लाइनमध्ये असलेले औषध) दिले. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना इतर धोका नसल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले. मात्र, करोना संसर्गापासून वाचण्यासाठी तातडीने लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘या’ देशात करोनाचा हाहाकार; दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू पोलीस तपासात याचा खुलासा झाला आहे. या नर्सचे नाव उघड करण्यात आले नाही. पोलिसांकडून सध्या तिची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी पीटर बीअर यांनी म्हटले. या नर्सचे लशीबाबत फारसं अनुकूल मत नव्हते असेही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये आढळले असल्याचे त्यांनी म्हटले.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...
मुंबई, 1 जुलै- छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी (TV Actress) एक अशी अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) ओळख आहे. अंकिता सतत कोणत्या ना कोणत्या...
नवी दिल्ली :WhatsApp call: इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp यूजर्सची संख्या मोठी आहे. आता WhatsApp चा वापर केवळ चॅटिंग, फोटो-व्हिडिओ पाठवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही....
मुंबई, 1 जुलै : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेला (Shiv Sena) झटका देण्यासाठी रणनीती...