Friday, May 20, 2022
Home क्रीडा धोनीनंतर 'या' स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

धोनीनंतर ‘या’ स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत


मुंबई : यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे.

धोनीचा पर्याय म्हणून रवींद्र जाडेजाची कर्णधार पदासाठी चाचपणी झाली. मात्र यात तो Out झाला. त्यामुळे आता चेन्नई नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. Out झालेल्या रवींद्र जाडेजा ऐवजी नवीन ओपनिंग कॅप्टनच्या शोधात असलेल्या चेन्नईला भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने भविष्यवाणी करत एक नाव सुचवले आहे. सेहवागने सुचवलेल्या या नावावर आता चेन्नई शिक्कामोर्तब करते का ? हे पहावे लागणार आहे.  

IPL 2022 च्या सुरुवातीला महेंद्रसिंग धोनी MS Dhoniने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली. मात्र नुकत्याच काही सामन्यापूर्वी जाडेजाने  कर्णधारपद सोडलं आणि धोनीच्या हाती
 पुन्हा कर्णधार पदाची जबाबदारी आली. मात्र तो निव्वळ या हंगामापूरतीच जबाबदारी स्विकारणार आहे.  त्यामुळे पुढच्या हंगामात नवीन कर्णधार कोण असेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग नेहमीच भविष्यवाणी करत असतो. आता त्याने चेन्नईच्या कर्णधार पदाबाबत भविष्यवाणी केली आहे.  ऋतुराज गायकवाडमध्ये संघाचा पुढचा कर्णधार होण्याची क्षमता आहे. चांगला कर्णधार होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण त्याच्यात आहेत. 
तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्णधार आहे, त्यामुळे त्याला सामन्यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे माहित आहे. चेंडू कोणाला द्यायचा, फलंदाजीच्या क्रमात कोणते बदल करायला हवेत. याची त्याला कल्पना आहे, असे सेहवाग म्हणालाय. 

पुढे सेहवाग म्हणाला, ‘तो महाराष्ट्राचा खेळाडू आहे. तो खूप शांतपणे खेळतो. त्याने शतक झळकावले असो वा शून्यावर बाद असो, त्याची प्रतिक्रिया सारखीच असते असे दिसते.शतक झळकावताना तो आनंदी आहे की शून्यावर बाद झाल्यामुळे दुःखी आहे हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही.
 “कोणाचाही हंगाम चांगला असू शकतो, परंतु जर त्याने 3-4 हंगाम चांगले खेळले तर तो महेंद्रसिंग धोनीनंतर बराच काळ कर्णधार होऊ शकतो.”

ऋतुराज गायकवाडची कामगिरी

ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकली होती.  यावर्षी त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव नक्कीच आहे. 
तरीही तो चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#धननतर #य #सटर #खळडकड #कपटनस #भरतचय #मज #करकटपटच #भकत

RELATED ARTICLES

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

Most Popular

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

20 मे दिनविशेष, जाणून घ्या इतिहासातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना

20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...