मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा मुलगा, करण देओल लवकरात लवकर लग्न करणार आहे. किंबहुना त्यानं आपल्या प्रेयसीशी साखरपुडाही केल्याचतं म्हटलं जात आहे. पण,अद्यापही देओल कुटुंबानं मात्र यापैकी कोणत्याच वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करण देओल याला आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नाही. बिमल रॉय यांची पणती द्रिशा हिला करण डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या आणि त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याची माहिती समोर आली.
द्रिशा आणि करण बालपणीपासूनचेच मित्र. द्रिशा आणि करणनं साखरपुडा केला की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पण, धर्मेंद्र यांची खालावलेली प्रकृती पाहता ही जोडी येत्या काळात लवकरात लवकर लग्नबंधनात अडकू शकते असं सांगण्यात येत आहे.
सहसा सेलिब्रिटी कुटुंबांमध्ये एखादा लग्नसोहळा असला, की त्याचा बराच गाजावाजा होतो. पण, इथं करणच्या लग्नाची मात्र काही चर्चाच नसल्यामुळं असं नेमकं का होतंय हाच प्रश्न अनेकांनी विचारला. (Dharmendra grandson wedding)
अखेर ते कारण समोर आलंच. करण किंवा देओल कुटुंब त्यांच्या सुनेला लपवत नाहीत पण, परिस्थितीमुळं गोष्टी फार वेगात घडत असल्याचं चित्र आहे. तेव्हा आता उत्सुकता आहे ती म्हणजे सनी देओलच्या होणाऱ्या सुनेला आणि धर्मेंद्र यांच्या नातसुनेला पाहण्याची.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#धरमदरचय #नतवच #गपचप #सखरपड #क #लपवव #लगतय #हणर #बयक