Thursday, May 26, 2022
Home करमणूक 'धर्मवीर' चित्रपटासाठी पत्नी मंजिरी ओकने अशी दिली साथ? प्रसाद ओक म्हणाला "ती...

‘धर्मवीर’ चित्रपटासाठी पत्नी मंजिरी ओकने अशी दिली साथ? प्रसाद ओक म्हणाला “ती दिवसातून…” | Prasad oak share experience how wife Manjiri Oak help him for Dharmaveer Anand Dighe role nrp 97ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओकनं ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला या चित्रपटासाठी त्याची पत्नी मंजिरीने कशाप्रकारे साथ दिली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने फार स्पष्टपणे उत्तर दिले.

Loksatta Exclusive: आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओकला पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले, “आता बाळासाहेब….”

प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

“धर्मवीर’ चित्रपटात मंजिरीने मला फार वेगळ्या प्रकारे साथ दिली. मुळात मला दिग्दर्शक व्हायचं कारण मला दिग्दर्शन आवडतं हे आहेच, पण त्याच्याबरोबरीने मला मेकअपचा खूप कंटाळा आहे. त्यामुळे माझं झुकतं माप हे अभिनय की दिग्दर्शन तर दिग्दर्शन. कारण दिग्दर्शकाला मेकअप करावा लागत नाही. त्याला कोणताही गेटअप करावा लागत नाही. दाढी मिश्या लावा, इकडे हे चिकटवा, तिकडे ते सोल्यूशन लावा. मग ते खेचून काढा याचा मला प्रचंड कंटाळा आहे. त्यामुळे नाटकातही मी मेकअप करत नाही आणि हास्यजत्रेच्या सेटवेळीही मी डोळ्याखाली थोडं अंडराईज करतो आणि जातो. मला मेकअपचा खूप कंटाळा आहे. तासनतास बसून राहा आणि ते मेकअप करणार या दोन कारणांसाठी मुळात दिग्दर्शक झालो.

माझ्या अभिनयाच्या वर्कशॉपमध्ये ती माझी विद्यार्थिनी होती. मी पुण्यात अभिनयाचे वर्कशॉप घेत होतो आणि तिकडे आमचं जमलं. त्यामुळे मला दिग्दर्शनाची असलेली आवड आणि माझ्या चिडचिड होण्याची सर्व कारण तिला इतकी वर्षे माहिती आहेत. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा आला, तेव्हा तिला मी सांगितलं त्यावेळी ती मला पटकन म्हणाली ‘दिघे साहेब म्हणजे ते ठाण्यातले, मोठा माणूस होतो तो.’ त्यानंतर तिने तिच्या पद्धतीने सर्व रिसर्च केलं, वाचलं आणि ती मला म्हणाली, ‘प्रसाद त्यांचा फोटो बघितला एवढी मोठी दाढी, मिशी आहे. तर आता…’, त्यावर मी तिला म्हणालो, “आता काय लावावी लागेल, आता फायनल झालं आहे.”

यानंतर ती मला दररोज सांगायची दाढी, मिशीमुळे वैतागू नकोस, असा रोल तुझ्या आयुष्यात परत कधी येईल तुला माहिती नाही. येईल, नाही येईल पुढचा आता आपण विचार करुया नको. आता तो आलाय तुला खूप शांतपणे, उत्तम करायचाय, अशी ती मला रोज सांगायची.

मेकअप करताना चिडचिड करु नको, असे ती रोज फोन करुन सांगायची. माझ्या मेकअप मॅनलाही ती चार ते पाच तासाने फोन करायची, सर ओके आहेत का? चिडले नाही ना? ही मदत अशा रोल करताना माझ्यासाठी फार मोलाची आहे. चंद्रमुखी किंवा हिरकणी चित्रपटात तिने प्रत्यक्ष वाटा उचलला. तसा यात तिचा अप्रत्यक्षपण वाटा होता, पण तो फार मोलाचा होता.”, असे प्रसादने यावेळी म्हटले.

“मी तुमच्या जागी असतो तर मला हे बोलता आलं नसतं…”, प्रसाद ओकने सांगितला अमिताभ बच्चनसोबतच्या भेटीचा किस्सा

दरम्यान ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#धरमवर #चतरपटसठ #पतन #मजर #ओकन #अश #दल #सथ #परसद #ओक #महणल #त #दवसतन #Prasad #oak #share #experience #wife #Manjiri #Oak #Dharmaveer #Anand #Dighe #role #nrp

RELATED ARTICLES

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

Most Popular

तब्बल 141 दिवस शनि महाराजांची आहे उलटी चाल; या राशीच्या लोकांनी काळजी घ्या

मुंबई, 26 मे : शनीची उलटी चाल कुंभ राशीत सुरू होणार आहे. 05 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री (Shani Vakri) होईल. रविवार,...

मेरा नाम हमेशा बिकता है! फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री केल्यानंतर हार्दिक पंड्याचं वक्तव्य

मुंबई : हार्दिक पांड्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया, वाद-विवाद यांचा सामना केला आहे. या सर्व गोष्टी मागे टाकून त्याने इंडियन प्रीमियर...

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

डॉग वॉकसाठी अख्ख स्टेडिअम केलं रिकामं, IAS अधिकाऱ्याच्या कृतीनं खेळाडू संतापले

दिल्लीतील एका IAS अधिकाऱ्याला निव्वळ आपल्या कुत्र्याला फिरवता यावे यासाठी संपुर्ण स्टेडिअम रिकाम कराव लागत असल्याची घटना समोर आली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा...

26th May 2022 Important Events : 26 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

26th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला...

Women’s Health Day 2022 : महिलांच्या लैंगिक आणि रिप्रोडक्टिव आरोग्याबद्दल डॉक्टर सांगतायत 5 महत्वाच्या टिप्स, जाणून घ्या

संकोच वा भीतीमुळे स्त्रियांमध्ये लैगींक व प्रजननासंबंधी समस्यांविषयक फारशी जागरुकताही दिसून येत नाही लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे...