Thursday, July 7, 2022
Home करमणूक 'धर्मवीर'मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, "राजकीय घडामोडी सुरु...

‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “राजकीय घडामोडी सुरु असताना…” | dharmaveer movie actor kshitish date instagram post on political leader eknath shinde viral on social media


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. राजकीय विश्वात अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. राजकारणाबाबत अनेकजण विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशामध्येच कलाविश्वातील काही मंडळींनी आपलं मत मांडलं आहे. आता ‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता क्षितीश दाते याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – Photos : मालदीवमध्ये पोहोचल्या ‘आई कुठे काय करते’मधील कांचन आजी, नवऱ्यासोबत शेअर केले फोटो

क्षितीश दाते नेमकं काय म्हणाला?
अभिनेता क्षितीश दातेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीशने एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये क्षितीक्षचा ‘धर्मवीर’मधील लूक पाहायला मिळत आहे. तसेच ‘थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असं या फोटोबरोबर लिहिलेलं दिसत आहे.

हा फोटो शेअर करत क्षितीशने म्हटलं आहे की, “मोठी राजकीय उलाढाल चालू आहे. चेष्टेमध्ये मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं हे वेगळं. हे असं छापणं चूक आहे.” एका वर्तमानपत्रामध्ये मीम्स छापून आल्याने क्षितीशने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिशने उत्तमरित्या साकारली.

आणखी वाचा – Photos : सिद्धार्थ जाधव आणि पत्नी तृप्ती यांच्या नात्यामध्ये दुरावा?, दुबई ट्रिपदरम्यान एकही एकत्रित फोटो नाही

या चित्रपटामुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. क्षितीशने मराठी नाटक, चित्रपटांमध्ये आजपर्यंत उत्तम काम केलं. ‘धर्मवीर’ चित्रपटामधील भूमिकेमुळे त्याचं विशेष कौतुक झालं. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत हेमंत ढोमे, आरोह वेलणकर, ऋषिकेश जोशी सारख्या कलाकारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#धरमवरमधय #एकनथ #शद #यच #भमक #सकरणऱय #अभनतयच #सतप #महणल #रजकय #घडमड #सर #असतन #dharmaveer #movie #actor #kshitish #date #instagram #post #political #leader #eknath #shinde #viral #social #media

RELATED ARTICLES

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Most Popular

पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग; लाखोंची सामग्री आगीत जळून खाक

Mumbai Powai Fire : पवई च्या हीरानंदानी मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना. अस्वीकरण:...

Plastic Bottle : प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे का?

Plastic Bottle : आपण जनरली कुठंही घराबाहेर पडत असलो की सोबत पाण्याची बॉटल ठेवतोच. यात बहुतांश बॉटल्स या...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

लालू यादव यांची प्रकृती ढासळली; तातडीने दिल्लीला हलणावर, मुलीची भावुक पोस्ट

पाटणा, 6 जुलै : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहे. त्यांना...

दैनंदिन राशीभविष्य: काय राशी..काय ग्रह..काय भविष्य? ओक्केमध्ये जाईल आजचा दिवस?

आज दिनांक ७ जुलै २०२२ गुरूवार . तिथी आषाढ शुक्ल अष्टमी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.. पाहुया आजचे...

संजय राऊतांना धक्का; मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली

Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात...