पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोराने ही घटना ऑनलाईन दाखवण्यासाठी कॅमेरा वापरला. सध्या पोलिसांनी या 18 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. तर त्याचे नाव अद्याप सांगितले गेलेले नाही.
कृष्णवर्णीयांवर हल्ला –
बीबीने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या परिसरात ही घटना घडली त्याठिकाणी कृष्णवर्णीयांचे प्रमाण जास्त आहे. तसेच गोळीबाळ झालेल्यांमध्येही कृष्णवर्णीयांचा समावेश आहे. बफेलोचे पोलीस आयुक्त ग्रैमाग्लिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जणांवर गोळी झाडण्यात आली. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संशयिताने अनेक तास गाडी चालवून शहरातील या भागात तो पोहोचल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा – UAE चे राष्ट्रपती शेख खलिफांनी घेतला अखेरचा श्वास, जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रप्रमुख अशी होती ओळख
आधी केला हल्ला नंतर आरोपीचे आत्मसमर्पण –
सुपरमार्केटमध्ये काम करणारे 3 जण गंभीर जखमी आहेत. तर येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने संशयितावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. पोलिसांनी सांगितले की, संशयिताकडे रायफल होती आणि त्याने हेल्मेटही घातले होते. नंतर त्याने आत्मसमर्पण समर्पण केले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. तर एफबीआयचे बफेलो ऑफिस येथील एजंट स्टीफन बेलोन्गिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही या घटनेची कसून चौकशी करत आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#धककदयक #सपरमरकटमधय #वरषय #तरणच #गळबर #हललयत #ठर