Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल धक्कादायक! विचित्र आजाराने ग्रस्त लेकाने रागात तोडली आईची बोटं

धक्कादायक! विचित्र आजाराने ग्रस्त लेकाने रागात तोडली आईची बोटं


ब्रिटन, 11 ऑगस्ट : राग (Anger) हा प्रत्येकामध्ये असतो. काहींना तो कमी प्रमाणात येतो (Angry person) तर काहींना जास्त प्रमाणात. काहींना आपल्या रागावर कंट्रोल ठेवता येतो तर काहींना आपला राग बिलकुल आवरत नाही. पण फार फार तर अति राग म्हणजे किती असावा? चक्क लेकाने आपल्या आईची बोटं तोडण्याइतपत राग? (Son broke mothers fingers) हा इतका राग कसा काय? तर हा मुलगा एका विचित्र आजारामुळे (Rare disease) ग्रस्त आहे. ज्यामुळे त्याला इतका राग येतो.
असे बरेच आजार आहे, ते दुर्मिळ (Rare Syndrome) आणि विचित्र आहेत. म्हणजे असे आजारही असू शकतात, यावर आपल्याला विश्वास बसत नाही. अशाच आजाराशी झुंज देणारा 18 वर्षांचा कॅमेरून लिंडसे (Cameron Lindsay). ज्याने रागात चक्क आपल्या आईची बोटं तोडली आहे.
कॅमेरून ला 2013 पासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याला पांडास सिंड्रोम (PANDAS Syndrome) आहे. सुरुवातीला कॅमेरूनच्या मेंदूत इन्फेक्शन झालं. ते पसरल्यानंतर त्याला पांडास सिंड्रोम झालं. हा सिंड्रोम असलेल्यांना अचानक राग येतो. ते खूप रागिष्ट असतात आणि त्यांना एंझायटीही समस्या होते.
हे वाचा – सावधान!कोरोनाच्या आडून हा आजार कधी वाढला कळालंच नाही; 5 राज्यांमध्ये जास्त रुग्ण
कॅमेरूनला इतका राग यायचा की तो आपल्या कुटुंबासमोर चाकू काढून त्यांना घाबरवायचा. त्यांना हानी पोहोचवयाच. कॅमेरूनला भास व्हायचे. कॅमेरूनची आई नताशा सांगते, या आजारामुळे कॅमेरून असा वागतो, जणू काय त्याच्यावर भूतच चढलं आहे. त्याची काळजी घेणं खूप कठीण होतं.
2014 साली त्याचा हा आजार अधिकच वाढला. तो घरच्यांना मारहाणही करू लागला. कॅमेरूनची स्थिती पाहतात त्याला प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. यानंतर हळूहळू त्याचा आजार जणू गायबच झाला. 2018 पर्यंत औषधं आणि प्लाझ्मा थेरेपीमुळे कॅमेरूनची प्रकृती खूपच सुधारली होती. पण सिंड्रोममुळे त्याच्या मेंदूच्या कार्यात बिघाड झाला होता. तो बोलणं विसरला होता. त्याला पुन्हा सर्वकाही शिकावं लागलं.
हे वाचा – अरे बापरे! पाणी समजून झोपेत घटाघट प्यायला मेण; तरुणाची झाली भयंकर अवस्था
हळूहळू कॅमेरूनची प्रकृती ठिक होऊ लागली, पांडासचा परिणाम आता त्याच्यावर कमी दिसतो आहे. पण त्याचे मूड स्विंग अद्यापही भयंकर आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये त्याला घरात बंदिस्त करून ठेवण्यात खूप अडचण झाली. पण तो स्वतःला सांभाळतो आहे, असं कॅमेरूनची आई नताशाने सांगितलं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#धककदयक #वचतर #आजरन #गरसत #लकन #रगत #तडल #आईच #बट

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

सुरक्षिततेच्या दृष्टिने UPI PIN बदलत राहणे आवश्यक, पिन बदलण्यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

UPI Payments: आजपासून काही वर्षांपूर्वी जर दुसऱ्या शहरात असलेल्या तुमच्या एखाद्या नातेवाईकाला पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला मोठी प्रक्रिया करावी लागायची. त्यावेळी पैशांचा व्यवहार...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी...

तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण

मुंबई, 01 जुलै: 27 जून रोजी संध्याकाळी बायजूस कंपनीनं (Byjus Company) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापक आणि एचआरचे फोन...

Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा...