मुंबई : भारतात सेक्सबाबत बोलणं अजूनही एक टॅबू मानला जातो. लोकं या विषयावर उघडपणे बोलणं टाळतात. पण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून मोठी माहिती समोर आली आहे. या सर्व्हेतून सेक्ससंदर्भात महत्त्वाची माहिती गोळा केली आहे.
या सर्वेक्षणात लोकांना विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. जसं की, लग्नाशिवाय सेक्स करणं चुकीचं आहे का? कोणत्या वयात लैंगिकदृष्ट्या सेक्सुअली एक्टिव होणं योग्य? या सर्वेक्षणातून असं समोर आलं की, स्त्री-पुरुषांचा सेक्सबाबतचा दृष्टिकोन पूर्णपणे भिन्न आहे.
स्त्रिया पुरुषांपेक्षा लवकर सेक्शुअली एक्टिव होतात, असं या अहवालात समोर आले आहे. वयाच्या 15 व्या वर्षी मुली फिजिकल इंटीमेसीसाठी तयार होतात. तर मुलांमध्ये याची शक्यता कमी असते.
सर्वेक्षणात 25 ते 49 वयोगटातील महिलांना विचारण्यात आलं की, त्यांनी पहिल्यांदा कधी लैंगिक संबंध ठेवले होते. यामध्ये 10.3 टक्के महिलांनी वयाच्या 15 व्या वर्षी संबंध असल्याचं मान्य केलं. त्याच वेळी, पुरुषांची संख्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पट कमी होती. या वयात सेक्स करणाऱ्या पुरुषांची संख्या 0.8 टक्के होती.
या सर्व्हेक्षणातून समोर आलंय की, सहा टक्के महिलांनी सांगितलं की, वयाच्या 18 व्या वर्षाच्या अगोदर त्यांनी शारीरिक संबंध ठेवले होते. त्याच वेळी, 18 वर्षांखालील 4.3 टक्के मुलांनी लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. भारतात लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 18 वर्षे निश्चित केलं आहे.
मुली सेक्शुअली एक्टिव होण्याची अनेक कारणं आहेत. अनेक मुली लैंगिक छळाच्या बळी आहेत. भारतीय समाजात पुरुषांचं वर्चस्व आहे आणि सेक्सच्या बाबतीतही त्याच पद्धती चालतात. त्याच वेळी, 3 टक्के मुलींनी सांगितलं की, वयाच्या 22 वर्षापूर्वीच त्यांच्यावर बलात्कार झाला होता.
सर्वेक्षणात असेही समोर आलं आहे की, अशिक्षित मुलींनी पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवण्याचं सरासरी वय 17.5 होचं. त्याच वेळी, सुशिक्षित मुलींमध्ये हे सरासरी वय 22.8 होतं. गरीब मुली 17.8 वर्षात लैंगिक संबंधांना सामोऱ्या जातात. तर श्रीमंत मुलींबाबत हे सरासरी वय 21.2 होते. तर, प्रत्येक वयोगटातील मुलांचं शारीरिक संबंध अनुभवाचं सरासरी वय 22 ते 25 वर्षे आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#धककदयक #वसतव #समर #भरतत #सबध #ठवणयत #मलपकष #मल #आघडवर