Sunday, January 16, 2022
Home विश्व देशासाठी तालिबानसोबत लढणाऱ्या सलिमाला अखेर अटक; शेवटच्या क्षणापर्यंत दिली झुंज

देशासाठी तालिबानसोबत लढणाऱ्या सलिमाला अखेर अटक; शेवटच्या क्षणापर्यंत दिली झुंज


काबूल, 18 ऑगस्ट: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान संघटना एकीकडे आपलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे आपला खरा रंगही दाखवायला सुरुवात केली आहे. देशाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या महिला सलीमा मजारी (Salima Mazari Arrested) यांना तालिबानं पकडलं आहे. सलीमा या अफगाणिस्तान देशाच्या पहिल्या महिला गवर्नर (Afghaninstan First Female Governer) आहेत. अलीकडच्या काळात तालिबाननं देशात हिंसाचाराला सुरुवात केल्यानंतर सलीमा यांनी तालिबान विरोधात आपली स्वतःची फौज निर्माण (War against Taliban) केली होती. त्यांनी शेवटपर्यंत तालिबानशी लढा दिला आहे.

तालिबानचा वाढता प्रभाव लक्षात घेता, अफगाणिस्तानचे अनेक नेते देश सोडून पळून जात होते. पण सलीमा मजारी या तालिबान विरोधात आपल्या काही सैनिकांसोबत एकट्या उभ्या होत्या. अफगाणिस्तानचा बल्ख प्रांतावर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर, बल्ख प्रांतातील चाहर जिल्ह्यातील सलीमा मजारी यांना तालिबाननं अटक केली आहे.
हेही वाचा-अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सचा जवान दिल्लीत विकतोय फ्रेंच फ्राईज; म्हणाला…
अफगाणिस्तानच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीनच महिला गवर्नर म्हणून नियुक्त झाल्या आहेत. सलीमा मजारी या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गवर्नर होत्या. सलीमा या बल्ख प्रांतातील चाहर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. येथील एकूण लोकसंख्या जवळपास 32 हजारांहून अधिक आहे. पण त्यांनी शेवटपर्यंत तालिबानला आपल्या भागावर ताबा मिळवू दिला नाही. या भागासाठी तालिबान्यांना बराच संघर्ष करावा लागला आहे.
हेही वाचा-नवीन सरकारमध्ये अफगाण महिलांना स्थान मिळणार का? तालिबानचा मोठा निर्णय
जन्म इराणमधील पण लढा अफगाणिस्तानसाठी
सलीमा मजारी यांचा जन्म इराणमध्ये झाला होता. पण सोव्हिएत युद्धादरम्यान त्या अफगाणिस्तानात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तेहरान विद्यापीठात शिक्षण घेतलं, अफगाणिस्तानच्या राजकारणाकडे वळाल्या. तालिबाननं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मभूमीसाठी तालिबानचा रोष ओढावून घेतला आहे. आपली सैन्यांची तुकडी उभी करून शेवटच्या क्षणापर्यंत तालिबानशी लढल्या. पण अखेर त्यांना तालिबाननं अटक केली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दशसठ #तलबनसबत #लढणऱय #सलमल #अखर #अटक #शवटचय #कषणपरयत #दल #झज

RELATED ARTICLES

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

विराट कोहलीनं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला….

विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचा -२० आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.  स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय कसोटी...

कुणाला कशाचं तर अमिताभ यांना वाढत्या दाढीचं टेन्शन, फोटो शेअर करत…

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग्स शेअर...

‘ कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची…’ किरण मानेंचा निर्मात्यांवर गंभीर आरोप

मुंबई,16 जानेवारी-  गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते किरण माने   (Kiran Mane)  प्रचंड चर्चेत आहेत. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali...

मुंबईत अपघाताचा थरार, वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; रेस्क्यूनंतर चालकाची सुटका

मुंबई, 16 जानेवारी: मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. वाळूनी भरलेला ट्रक एका रिक्षावर पलटी झाला. अपघातामध्ये रिक्षासह ड्रायव्हर...

विराटचा ‘हा’ निर्णय वैयक्तिक; कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले…

मुंबई : विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. विराट कोहलीने शनिवारी...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...