Saturday, November 27, 2021
Home भारत देशात पुन्हा कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासांत लसीकरणाचा आकडाही घट

देशात पुन्हा कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासांत लसीकरणाचा आकडाही घट


India Coronavirus Updates : भारतात कोरोना संसर्गाच्या दैनंदिन रुग्णवाढीत एका दिवसाच्या कमतरतेनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तसेच, लसीकरणाच्या आकड्यातही घट झाली आहे. काल देशात तब्बल पाच महिन्यांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच आज बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 35,178 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 55 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर काल देशात 88 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 440 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 24 तासांत 37,169 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोरोनाची एकूण आकडेवारी 

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 22 लाख 85 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 32 हजार 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 85 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहू कमी झाली आहे. एकूण 3 लाख 67 हजार रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. 

देशातील सध्याची कोरोनास्थिती : 

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 22 लाख 85 हजार 857
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 14 लाख 85 हजार 923
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 67 हजार 415
एकूण मृत्यू : चार लाख 32 हजार 519
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 56 कोटी 6 लाख 52 हजार लसींचे डोस

राज्यात काल (मंगळवारी) 4,145 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद

राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ  लागली आहे. काल (मंगळवारी) 4,408 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 01 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.87टक्के आहे. 

राज्यात काल (मंगळवारी) 116 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  61 हजार 306 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0),  धुळे (5), परभणी (41), हिंगोली (74),   नांदेड (49), अमरावती (90), अकोला (30), वाशिम (5),  बुलढाणा (45), यवतमाळ (9), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (2), चंद्रपूर (94)  गडचिरोली (29) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

भिवंडी निजामपूर, धुळे, जळगाव महानगरपालिका  परभणी,  अमरावती, अकोला, यवतमाळ,  वर्धा, गोंदिया , चंद्रपूर या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 821 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 12,91, 383 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,01, 213 (12.48 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,53,807 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 233 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 198 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 198 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 304 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,640 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1986 दिवसांवर गेला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दशत #पनह #करनबधतचय #दनदन #रगणसखयत #वढ #गलय #तसत #लसकरणच #आकडह #घट

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

हायलाइट्स:स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरूनवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

Most Popular

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...