Saturday, August 13, 2022
Home भारत देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, 50 टक्के रुग्ण...

देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, 50 टक्के रुग्ण फक्त केरळमधील


Coronavirus Cases Today : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,625 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 562 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहेय केरळमध्ये काल सर्वाधिक 23,676 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 36,668 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

केरळमध्ये पुन्हा 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद 

केरळमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 23,676 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढून 34.49 लाख झाली आहे. केरळमध्ये सलग सहाव्या दिवशी 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

देशातील कोरोनाची स्थिती 

कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 17 लाख 69 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 25 हजार 757 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 9 लाख 33 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 10 हजार 353 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात काल (मंगळवार) 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात काल (मंगळवार) 6005 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 10 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. 

राज्यात काल (मंगळवार) कोरोनामुळे 177 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल (मंगळवार) एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74  हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (87) वाशिम (77), गोंदिया (96), गडचिरोली (22)   या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नंदूरबार, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काल (मंगळवार) शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,85,32,523 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,21,068 (13.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,51,971 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4616 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1555 दिवसांवर गेला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दशत #गलय #तसत #हजरहन #अधक #करनबधतच #नद #टकक #रगण #फकत #करळमधल

RELATED ARTICLES

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...