Friday, May 20, 2022
Home लाईफस्टाईल देशातील 82% स्त्रिया नवऱ्याला सेक्ससाठी 'नाही' म्हणू शकतात, NHFS अहवाल

देशातील 82% स्त्रिया नवऱ्याला सेक्ससाठी ‘नाही’ म्हणू शकतात, NHFS अहवाल


नवी दिल्ली, 13 मे : गेल्या आठवड्यात आलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NHFS) मध्ये भारतीय जोडप्यांच्या लैंगिक संबंधांबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की 82% भारतीय स्त्रिया त्यांच्या पतींना सेक्सबद्दल नाही म्हणू शकतात. मात्र, ही आकडेवाडी राज्यानुसार वेगवेगळी आहे. या सर्वेक्षणानुसार लक्षद्वीपमधील बहुतांश महिला त्यांच्या निवडीबाबत आवाज उठवत आहेत. त्याच वेळी, लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) महिला या बाबतीत सर्वात जास्त संकोच करतात. तेथे केवळ 60% आणि 65% महिला थकलेल्या असल्या किंवा मन नसेल तरच सेक्स करण्यास नकार देण्याविषयी बोलल्या. महाराष्ट्रात (Maharashtra) काय स्थिती आहे? चला जाणून घेऊ.

बिहार आणि उत्तर प्रदेशातील महिलाही उघडपणे नकार देण्याच्या बाजूने
देशात तुलनेने मागास समजल्या जाणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील महिलांनीही शारीरिक संबंधांच्या बाबतीत इच्छा नसल्यास ‘नवऱ्याला नकार द्यावा’ अशी भूमिका स्पष्टपणे मांडली. बिहारमधील 81% पेक्षा जास्त महिलांनी या विषयावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त करण्याबद्दल बोलले, तर उत्तर प्रदेशातील 83% महिला नकार देण्याबद्दल बोलल्या आहेत.

ईशान्य भारतातील महिला त्यांच्या विरोधाबाबत स्पष्ट
भारतातील ईशान्येकडील राज्यांचा (North Eastern States) अहवाल पाहिला तर हे सर्वेक्षण थेट सांगते की या राज्यांतील महिला त्यांच्या संमती आणि असहमतीबाबत अगदी स्पष्ट आहेत. मेघालय (सुमारे 74%) आणि सिक्कीम (सुमारे 78%) वगळता बहुतेक राज्यांमधील 80% पेक्षा जास्त महिलांनी उघडपणे त्यांचा ‘नकार’ नोंदवला आहे. या प्रकरणात मिझोराम अव्वल आहे जिथे 93% महिलांनी निर्णय आपल्या हातात ठेवला आहे.

डोळ्याखाली डार्क सर्कल आहेत? असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण, करू नका दुर्लक्ष
दिल्ली, पंजाब आणि हरियाणाची स्थिती काय आहे?
देशाची राजधानी दिल्ली, जी महिलांच्या हक्कांच्या अनेक बाबींचे केंद्रबिंदू आहे, या पैलूंवर त्यांचे बहुमत आहे. दिल्लीतील 88 टक्के महिलांना त्यांच्या विरोधाची जाणीव आहे, तर पंजाबमध्ये केवळ 73 टक्के महिला आणि हरियाणातील 84 टक्के महिला उघडपणे बोलू शकतात. पंजाबमधील पुरुषांबाबतही एक चिंताजनक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये दर दहापैकी सहा पुरुष मतभेदानंतरही आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यावर विश्वास ठेवतात.

महाराष्ट्रात महिलांची परिस्थिती कशी?
महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटले जाते. परिणामी येथील महिलांमध्ये आपले हक्क आणि अधिकांची जाणीव दिसून येते. राज्यातील 87 टक्के महिला इच्छा नसल्यास नवऱ्याला नकार देऊ शकतात. हे प्रमाण शेजारील गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा या राज्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, सर्वात छोटे राज्य गोव्यातील महिला मात्र यात सर्वात पुढे आहेत. गोव्यातील 91.9 टक्के महिला मनाची तयारी नसल्यास सेक्ससाठी नकार देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दशतल #सतरय #नवऱयल #सकससठ #नह #महण #शकतत #NHFS #अहवल

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

तलावाचा वापर न करता मत्सपालन करा तेही वर्षाला पाचपट फायद्यासह, जाणून घ्या पद्धत

मुरादाबाद, 19 मे : उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला परिसरात एका शेतकऱ्यांने मत्सपालनातून (Fish farming) विक्रमी उत्पादन घेतले आहे. माझोला या...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.

मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट...

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...