Thursday, July 7, 2022
Home करमणूक 'देशातले खरे हिरो म्हणजे','आई कुठे काय करते'फेम मिलिंद गवळींची पोस्ट होतेय VIRAL

‘देशातले खरे हिरो म्हणजे’,’आई कुठे काय करते’फेम मिलिंद गवळींची पोस्ट होतेय VIRAL


मुंबई, 24 जून- ‘आई कुठे काय करते’  (Aai Kuthe Kay Karte)  ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड तुफान लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील कलाकारसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेतून ‘अनिरुद्ध’ च्या  (Anirudha) भूमिकेतून अभिनेते मिलिंद गवळी   (Milind Gawali)  घराघरात पोहोचले आहेत. मिलिंद गवळी हा मराठी चित्रपटसृष्टीतील ओळखीचा चेहरा आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र या मालिकेमुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली आहे.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत काही ना काही पोस्ट शेअर करुन सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. ते नियमित आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत पोस्ट करत चाहत्यांना अपडेट्स देत असतात. सोबतच अनेक जुने फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत आपल्या आठवणींना उजाळा देत असतात. आजही असंच काहीसं झालं आहे. मिलिंद गवळी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मिलिंद गवळी पोस्ट-
मिलिंद गवळी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक जुना व्हिडीओ शेअर करत लिहलंय, ”“स्वप्नांच्या दुनियाच माझं स्वप्न “
1975 मध्ये 15 ऑगस्ट ला “शोले” नावाचा पिक्चर रिलीज झाला .मिनर्व्हा थिएटरमध्ये तुडुंब गर्दी ,त्या काळामध्ये ब्लॅक मद्धे तिकीट विकली जायची .शोले चे तिकीट मिळवून आणि तो सिनेमा मिनर्वा मध्येच बघायचंय , हे पण माझं स्वप्न होतं , जे काही आठवड्यानंतर माझ्या वडिलांनी ते पूर्ण केलं , असंख्य सिनेमे बघितले ,सिनेमाशी निगडीत अशी असंख्य स्वप्न ही मी बघितली, (खरतर अजूनही बघतोच आहे )मी शाळेतच एक स्वप्न बघितलं होतं ,आपण सिनेमामध्ये काम करायचं ,दोन-तीन वर्षात “हम बच्चे हिंदुस्तान के” या चित्रपटात काम केले आणि ते ही स्वप्न पूर्ण झालं, त्यानंतर असंख्य सिनेमांमध्ये मी कामं केली , मग मी स्वप्न बघितलं , आपला स्वतःचा एक सिनेमा असावा ,आपण तो बनवावा आणि “अथांग” नावाचा सिनेमा मी केला , त्यामुळे स्वप्न बघावीत, छोटी बघावित, मोठी बघावीत then focus on it and work hard for it,आणि थोडा वेळ द्यावा ,मग ती नक्कीच पूर्ण होतात .

(हे वाचा:‘अशी सुंदरी दुसरी नाही’,अमृता खानविलकरच्या फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा )
अथांग सिनेमा बनवत असताना माझ्या घरची मंडळी कधीतरी सेटवर यायची, छान वाटायचं ,एक दिवस माझे वडील जे रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ,मुंबई .श्री श्रीराम गवळी साहेब सेटवर आले आणि त्यादिवशी माझे मित्र कन्न आयर (जो डीसीपी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस चा रोल करत होता) नेमका त्याचाच सीन शूट करत होतो,आमच्या ड्रेस मन ने डीसीपी चा युनिफॉर्म आणून दिला ,नेमका माझ्या वडिलांसमोर , पप्पांनी तो पाहायला आणि म्हणाले की हे सगळे बिल्ला /बॅचेस चुकीचे आहेत , डीसीपी चा ड्रेस आहे पण हवलदार चा बॅच / बिल्ला लावलेला आहे ,खरंच आम्हाला कोणाला ते लक्षात आलं नव्हतं ,खरंच सिनेमातले आम्ही सगळे खोटे-खोटे हिरो असतो,खरे आपल्या देशातले हिरो म्हणजे माझ्या वडिलांसारखेच असतात”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दशतल #खर #हर #महणजआई #कठ #कय #करतफम #मलद #गवळच #पसट #हतय #VIRAL

RELATED ARTICLES

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

Most Popular

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

Jio Plans: रिचार्ज करा आणि ३३६ दिवसांसाठी टेन्शन फ्री राहा , Jio चा सर्वात वार्षिक प्लान, पाहा डेटा-कॉलिंग बेनिफिट्स

नवी दिल्ली: Reliance Jio Annual Plans:टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या यूजर्सना वेळोवेळी अनेक फायदे ऑफर करत असते . किफायतशीर किमतीत चांगले प्लान उपलब्ध...

Pandharpur Ashadhi wari 2022 : ज्ञानोबांच्या पालखीचं आज तिसरं गोल रिंगण ABP Majha

<p>आषाढी एकादशी जवळ येऊ लागलेय तशी वारऱ्यांची पावलं वेगानं पंढरपूरकडे चालायला लागली आहेत... संत ज्ञानोबारायांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वी...

Mumbai : पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? वाचा..

Mumbai Police : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आता ईडी चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी ते...

Indian Railways Rule: रेल्वे बर्थ संदर्भात नवे नियम! प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, अन्यथा अडचण

नवी दिल्ली : Indian Railways Rule: तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी, तुमच्याकडे बर्थ निवडीचा...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...