मुंबई, 13 मे : फक्त 30 हजार लोकसंख्या असलेल्या जिब्राल्टर (Gibraltar) या देशाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 Cricket) इतिहास घडवला आहे. टीमच्या ओपनरनी पूर्ण 20 ओव्हर बॅटिंग करण्याचा विक्रम केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमने एकही विकेट न गमावता 20 ओव्हर बॅटिंग केली. जिब्राल्टर आयसीसीचा (ICC) असोसिएट सदस्य आहे. वालिटा कपदरम्यान (Valletta Cup) जिब्राल्टर आणि बुल्गारिया यांच्यात झालेल्या सामन्यात हा रेकॉर्ड झाला. जिब्राल्टरने पहिले बॅटिंग करत एकही विकेट न गमावता 213 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना बुल्गारियाने 6 विकेट गमावून 192 रन केले, त्यामुळे जिब्राल्टरचा 21 रननी विजय झाला.
या मॅचमध्ये जिब्राल्टरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. कर्णधार बालाजी पाय आणि लुईस ब्रुस यांनी 20 ओव्हर नाबाद राहिले. ब्रुस याचं शतक एका रनने हुकलं, तो 99 रनवर नाबाद राहिला. 63 बॉलमध्ये केलेल्या या खेळीमध्ये त्याने 11 फोर आणि 2 सिक्स मारले. तर पायने 59 बॉलमध्ये नाबाद 86 रन केले, ज्यात 11 फोर आणि एक सिक्स होती. जिब्राल्टरला 28 रन एक्स्ट्राच्या माध्यमातून मिळाल्या. बुल्गारियाने 8 बॉलरचा वापर केला, पण एकालाही विकेट घेता आली नाही.
पायने घेतल्या 2 विकेट
आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या बुल्गारियाने चांगली सुरूवात केली. 8 ओव्हरमध्ये त्यांचा स्कोअर 1 विकेटवर 87 रन होोता, पण त्यांना शेवटी 6 विकेट गमावून 192 रनच करता आले. सॅम हुसेनने 31 बॉलमध्ये सर्वाधिक 64 रन केले, यात 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. कर्णधार बालाजी पायने उत्कृष्ट बॉलिंगही केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 38 रन देऊन 2 विकेट घेतल्या, याशिवाय समर्थ बोधा यालाही 2 विकेट मिळाल्या.
40 वर्षांच्या बालाजी पाय याची ही 13वी आंतरराष्ट्रीय मॅच आहे. 45 च्या सरासरीने त्याने 493 रन केल्या आहेत, यात एक शतक आणि 3 अर्धशतकं आहेत, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 127 चा आहे. याशिवाय त्याने 14 विकेटही घेतल्या आहेत. 14 रनवर 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 16 वर्षांच्या लुईस ब्रुसने 13 मॅचमध्ये 42 च्या सरासरीने 465 रन केले, यात 6 अर्धशतकं आहेत, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 126 चा आहे, याशिवाय त्याला 6 विकेटही मिळाल्या आहेत. 13 रनमध्ये 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#दशच #लकसखय #हजर #पण #य #पठठयन #T20 #करकटमधय #कल #वरलड #रकरड