Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या देवेंद्र फडणवीसांची आज 'उत्तर' सभा, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला काय उत्तर देणार?

देवेंद्र फडणवीसांची आज ‘उत्तर’ सभा, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला काय उत्तर देणार?


Devendra Fadnavis : शिवसेनेच्या सभेनंतर लगेच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा होणार आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा लगावला होता. त्यांच्या या टीकेवर आज फडणवीस नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक आणि सत्ताधारी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना आणि भाजप यांच्यात तर सारखाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. त्याचबरोबर दुसरीकडे किरीट सोमय्या यांचे आरोपसत्र सुरुच आहे. तर त्यांच्या आरोपाला शिवसेना खासदार संजय राऊत हे उत्तर देताना दिसत आहेत. दरम्यान, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने  बुस्टर सभा घेतली होती. आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर फडणवीसांचे ट्वीट

कालच्या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला होता. भाषणात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरही शरसंधान साधलं. बाबरी पाडायला आपण उपस्थित होतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं, त्यावर ठाकरेंनी टीका केली. त्यावर आज फडणवीसांनी “जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा…” म्हणत पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत,  सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…अरे छट हा तर निघाला…आणखी एक  ‘टोमणे बॉम्ब’… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा”. असे ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दवदर #फडणवसच #आज #उततर #सभ #मखयमतरयचय #टकल #कय #उततर #दणर

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Most Popular

तुमचा Phone Call गुपचूप कोणी Record करतंय का? असं येईल ओळखता

नवी दिल्ली, 21 मे : जवळपास प्रत्येक मोबाइल युजरला कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती असेल. अनेकजण फोनवर बोलताना वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर करतात. काही महत्त्वाच्या...

Shivsena : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा उपक्रम, मुंबईकरांना मिळणार योगाचे धडे!

BMC Election 2022 : महापालिका निवडणूकीच्या (Municipal Corporation Elections) तोंडावर शिवसेनेचा (Shivsena) नवा उपक्रम येत्या १ जूनपासून सुरु...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

पहिल्याच भेटीत राणी मुखर्जीच्या प्रेमात पडले आदित्य चोप्रा, कुटुंबाची नाराजी पत्करत ‘या’ देशात

Aditya Chopra Birthday : ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक...