पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून विजयाचा घास हिरावला गेला. आता दुसरा कसोटी सामना हा लॉर्ड्सच्या मैदानात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात आर. अश्विनला संधी देण्यात यावी, असे मांजरेकर यांना वाटते. कारण अश्विन हा कोणत्याही खेळपट्टीवर विकेट्स मिळवू शकतो, त्याचबरोबर तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्याचबरोबर अश्विन काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटही खेळला होता आणि त्याचा फायदाही त्याला झाला होता. पहिल्या सामन्यात जेव्हा अश्विनला वगळण्यात आले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. पण संघात जर अश्विनला घ्यायचे असेल तर रवींद्र जडेजाला संघाबाहेर करावे, असे मांजरेकर यांना वाटत आहे. जडेजाने पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले होते. पण जडेजाला या सामन्यात गोलंदाजीमध्ये छाप पाडता आली नव्हती. त्यामुळेच दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने तिनशे धावांचा टप्पा ओलांडला होता आणि त्यामुळेच भारताचा विजय लांबणीवर गेला असता. जर भारताने इंग्लंडचा दुसरा डाव लवकर गुंडाळला असता तर त्यांना हा सामना जिंकता आला असता, पण तसे घडले नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात अश्विनला संधी द्यावी, असे मांजरेकर यांना वाटत आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात अजून एक बदल करण्याचे मांजरेकर यांनी सुचवले आहे. मांजरेकर यांनी याबाबत सांगितले की, ” माझ्यामते दुसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीला संधी द्यायला हवी. कारण हनुमा हा चांगला अष्टपैलू खेळाडू तर आहेच, पण तो संघात आल्यावर भारताची फलंदाजी अधिक बळकट होऊ शकते. त्यामुळे हनुमाचा भारतीय संघाला चांगला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर जर संघातून कोणाला वगळायचे असेल तर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला यावेळी वगळण्यात येऊ शकते.”
हनुमाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका वाचवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर हनुमा हा भारतीय संघापेक्षा जास्त काळ इंग्लंडमध्ये आहे आणि तो कौंटी क्रिकेटही खेळला आहे. त्यामुळे त्याला इंग्लंडच्या वातावरणाचा चांगला अंदाज आहे आणि तो लयीतही आहे. त्यामुळे त्याला जर यावेळी दिली तर भारताची फलंदाजी अधिक भक्कम होण्यास मदत होऊ शकते.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#दसऱय #कसटसठ #भरतय #सघत #ह #दन #मठ #बदल #वहयल #हवत #पह #सजय #मजरकर #कय #महणल