हायलाइट्स:
- नऊ वर्षीय दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या
- मृतदेह जाळण्याचा आरोपींकडून प्रयत्न
- ‘जेव्हापर्यंत त्यांना न्याय मिळत नाही राहुल गांधी त्यांच्यासोबत उभा आहे’
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी एका पुजाऱ्यासह चौघांना ताब्यात घेतलंय. या नराधमांकडून पीडित मुलीचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलंय.
राहुल गांधी यांनी आज सकाळीच पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्ली कॅन्ट परिसर गाठला. या भेटीनंतर वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना राहुल गांधी यांनी आपण पीडित कुटुंबासोबत असल्याचं म्हटलंय.
मी पीडित कुटुंबाशी संवाद साधला. त्यांना केवळ न्याय हवाय, आणखी काहीही नाही. अन्याय झाल्याची भावना असलेल्या या कुटुंबाला मदत मिळायला हवी आणि आम्ही ती देणार. आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत, याचं आश्वासन मी त्यांना दिलंय. जेव्हापर्यंत त्यांना न्याय मिळत नाही राहुल गांधी त्यांच्यासोबत उभा आहे, असं त्यांनी मीडियासमोर म्हटलंय.
दिल्लीतल्या या घटनेनं राजधानीलाच नाही तर अवघ्या देशाला हादरवून टाकलंय. दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना ही घटना घडलीय. या प्रकरणात विरोधकांकडून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
राहुल गांधी यांच्याशिवाय अनेक नेत्यांनी या घटनेची निंदा केली आहे. हे प्रकरण दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीनं हाताळलं त्यावर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#दलल #बलतकर #आण #हतय #रहल #गध #पडत #कटबचय #भटल