Friday, May 20, 2022
Home भारत दिल्लीत इमारतीला भीषण आग; 26 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू

दिल्लीत इमारतीला भीषण आग; 26 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू


Mundka Fire: पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची बातमीस समोर येत आहे. या आगीत 26 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती दुपारी 4.40 च्या सुमारास मिळाली, त्यानंतर 24 अग्निशामक गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी रात्री 10.30 वाजता सांगितले की, मदतकार्य सुरू आहे. 26 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन मजली व्यावसायिक इमारतीत ही आग लागली आहे. बचाव कर्मचारी अद्याप तिसऱ्या मजल्यावर पोहोचलेले नाहीत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 10 जण जखमी झाले आहेत. इमारतीतून 60-70 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आगीची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “या दुःखद घटनेबद्दल ऐकून धक्का बसला. मी सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. आमचे शूर अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. देव सर्वांचे भले करो.”

दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) समीर शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की तीन मजली व्यावसायिक इमारतीमध्ये कंपन्यांची कार्यालये आहेत. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून सुरू झाली, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दललत #इमरतल #भषण #आग #जणच #हरपळन #मतय #बचवकरय #सर

RELATED ARTICLES

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण

ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’

RRR On Netflix : एसएस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची...

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

Upcoming Phones: पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार Realme चा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : Realme GT Neo 3T To Debut in India : Realme लवकरच आपल्या नवीन दमदार स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता...