Thursday, May 26, 2022
Home क्रीडा दिनेश कार्तिकची व्हायरल कहाणी किती खरी? जाणून घ्या सत्य

दिनेश कार्तिकची व्हायरल कहाणी किती खरी? जाणून घ्या सत्य


मुंबई, 13 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीकडून (RCB) खेळताना दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) धमाकेदार कामगिरी केली आहे. आरसीबीने कार्तिकला लिलावात 5.5 कोटी रुपयांना विकत घेतलं, याचा टीमला बराच फायदा झाला. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कार्तिकने आरसीबीला बऱ्याच मॅच जिंकवल्या. कार्तिकच्या या फॉर्ममुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik Story) कहाणी व्हायरल झाली आहे. ‘वेळ सगळ्यांची येते, फक्त संयम ठेवण्याची गरज आहे,’ असं शिर्षक या कहाणीला देण्यात आलं आहे, तसंच ही कहाणी फेसबूक आणि ट्विटरवर बरीच व्हायरल झाली आहे.
दिनेश कार्तिकच्या कमबॅकची कहाणी यात सांगण्यात आली आहे, सोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाबाबतही यामध्ये लिहिण्यात आलं आहे. पत्नीसोबत घटस्फोट, तामीळनाडू टीमच्या कॅप्टन्सीवरून हकालपट्टी, धोनीमुळे टीम इंडिया बाहेर होणं आणि मग आयपीएलमध्ये धमाकेदार पुनरागमन, अशा रंजक गोष्टी या स्टोरीमध्ये सांगण्यात आल्या आहेत, पण या कहाणीची पडतळाणी केली असता यातल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या नसल्याचं समोर येत आहे.

दिनेश कार्तिकच्या कहाणीचं सत्य
सोशल मीडियावर क्रिकेटसंबंधी माहिती देणाऱ्या अमित सिन्हा यांनी या सगळ्याचं सत्य सांगितलं आहे. कार्तिकच्या स्टोरीचं फॅक्ट चेक करताना अमित सिन्हा यांनी वेगवेगळी तथ्य मांडली आहेत. 2011 साली दिनेश कार्तिकऐवजी मुरली विजय नाही, तर लक्ष्मीपती बालाजीला तामीळनाडूचं कर्णधार करण्यात आलं. कहाणीमध्ये जे सांगितलं आहे त्याच्या हे उलट आहे. दिनेश कार्तिकला मुरली विजयऐवजी आधीच कर्णधार करण्यात आलं होतं.
याशिवाय 2012 साली दिनेश कार्तिकला टीम बाहेर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं, पण कार्तिक 2010 पासूनच टीमबाहेर होता, कारण त्यावेळी वर्ल्ड कपसाठी मुख्य खेळाडूंनाच टीममध्ये स्थान मिळत होतं. 2013 साली दिनेश कार्तिकने टीममध्ये कमबॅक केलं, तेव्हा तो 15 मॅच खेळला.

रणजी सिझनबाबत जो दावा करण्यात आला, त्याउलट कार्तिकने 2012 साली तामीळनाडूसाठी 64 च्या सरासरीने 577 रन केले. फेसबूकवर शेयर होत असलेल्या पोस्टमध्ये दिनेश कार्तिक डिप्रेशनमध्ये गेल्याचं तसंच व्यसनाधीन झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. तसंच दिनेश कार्तिकला आयपीएलमधूनही बाहेर केल्याचा चुकीचा दावा करण्यात आला आहे. 2012 ते 2015 या मोसमात दिनेश कार्तिकने जवळपास प्रत्येक मॅच खेळली, ज्यात त्याने बऱ्याच रनही केल्या.
आयपीएलच्या या मोसमात दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 12 मॅचमध्ये 68.50 च्या सरासरीने 274 रन केले, यात तो 8 वेळा नाबाद राहिला, तसंच त्याने 21 फोर आणि 21 सिक्सही ठोकले. कार्तिकने भारतासाठी 26 टेस्टमध्ये 1025 आणि 94 वनडे सामन्यांमध्ये 1,752 रन तसंच 32 टी-20 सामन्यांमध्ये 399 रन केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दनश #करतकच #वहयरल #कहण #कत #खर #जणन #घय #सतय

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत गर्लफ्रेंड सबासह हृतिकची एंट्री, हातात हात घेऊन दिली रोमँटिक पोज

मुंबई: फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar Birthday) याने २५ मे रोजी त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान बॉलिवूडच्या या बड्या फिल्ममेकरच्या वाढदिवसाची पार्टीही...

Flipkart ची जबरदस्त ऑफर! 18,000 रुपये किमतीचा Kodak 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; जाणून घ्या

 Flipkart Electronics Sale : फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन कॉमर्स साईट्सवर इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरु झाला आहे.  हा सेल 24 मे पासून सुरु...

तुम्हालाही डायबिटीस आहे का? मग ‘या’ भाज्या खाणं टाळाच

मधुमेहाच्या रुग्णांना अशा आहारापासून दूर राहावे लागते ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

LSG vs RCB: …अन् त्या षटकानंतर आपण मोठी खेळी करु शकतो असं वाटलं; रजत पाटिदारने सांगितलं मॅच विनिंग खेळीचं गुपित | IPL 2022 LSG...

रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना १४ धावांनी जिंकला. ईडन गार्डन्स...

Smart TV Offers: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! १८ हजारांचा टीव्ही फक्त ५०० रुपयात, पाहा शानदार ऑफर

नवी दिल्ली : Discount on KODAK Smart TV: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरू आहे. २४ मे पासून...

महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट, “महाराज…. “

मुंबई, 26 मे : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) रिक्त होणाऱ्या जागांपैकी सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि सर्वपक्षीय...