Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना


Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज सकाळी झाला. खालापूर येथून ही पायी दिंडी आळंदीला निघाली होती. तेव्हा कान्हे फाटा येथे हा अपघात झाला. या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप गाडी घुसल्याने 15 ते 20 वारकरी जखमी झाले आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

खालापूरच्या उंबरगाव येथून ही दिंडी निघाली होती. माऊली चॅरिटेबल ट्रस्टची ही दिंडी आळंदीकडे पायी निघाली होती. कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी या दिंडीने प्रस्थान केले. कोरोनाच्या बिकट काळातील अनेक निर्बंध शिथिल झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पायी वारी करत होते. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. हातात भगव्या पताका आणि मुखात विठू माऊलीचा जप करत त्यांची दिंडी मावळ तालुक्यात पोहोचली होती. 

कालचा मुक्काम संपवून आज पुन्हा आळंदीच्या दिशेने त्याच जोमाने ते मार्गस्थ झाले. पण सकाळी सातच्या सुमारास पिकअप गाडीने विघ्न आणले. बेदरकारपणे निघालेल्या पिकअप चालकाकडून गाडी थेट दिंडीत घुसली. पंधरा वीस वारकरी गाडी खाली आले. त्यामुळे वारकरी सैरावैरा धावले, नंतर नेमकं काय घडलं हे त्यांच्या लक्षात आलं. 

मग जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी इत वारकरी धावले. वडगाव मावळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतलं आणि जखमी वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. लगतच्या खाजगी रुग्णालयांमध्ये जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत, पैकी दोन वारकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती वडगाव मावळ पोलिसांनी दिली. 

आळंदीत 2 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे, तर दोन दिवस आधी कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. तिथं ही दिंडी पोहचण्यासाठी पुन्हा पायी निघण्याची शक्यता आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दडत #पकअप #घसल #त #वरकर #जखम #पणयतल #वडगव #मवळनजकच #घटन

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Most Popular

दिल का दिया जलाके गया..

मृदुला दाढे-जोशी संगीतकार चित्रगुप्त यांचं स्मरण एरवी दुर्मीळच.. त्यांचा स्मृतिदिन १४ जानेवारीला होता, तेव्हा तरी या गुणी संगीतकाराची आठवण किती दर्दिंना आली असेल? सुंदर चित्राप्रमाणे...

Goa Accident : सेरावली गोवा येथे भरधाव येगात येणाऱ्या कारला अपघात; २ पोलिसांचा मृत्यू ABP Majha

<p>सेरावली गोवा येथे मध्यरात्री भरधाव येगात येणाऱ्या कारला अपघात झाला. मद्यपान करून कार चालवणाऱ्या चालकाला अटक.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Rohit Sharma on Virat Kohli: विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

नवी दिल्ली: विराट कोहलीने शनिवारी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. विराटने आधी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून...

टीम इंडिया कधीच कोणाचे उधार ठेवत नाही; ४८ तासात द.आफ्रिकेचा हिशोब चुकता केला

नवी दिल्ली: भारताचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला आणि टीम इंडियाने कसोटी मालिका...

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग दुसऱ्यांदा होऊ शकतो का?

मुंबई : सध्या जगभरात कोरोनाची अनेक प्रकरणं नोंदवली जातायत. या प्रकरणांमागे कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं सांगितलं जातंय. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनचा दोनदा...

Buldhana : ‘महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार,’ आमदार शशिकांत खेडेकरांची भूमिका

<p>बुलढाण्यातील लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोरचा महाराजांचा पुतळा हटवण्यास विरोध करण्यात येतोय. महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार असल्याची भूमिका आमदार शशिकांत खेडेकरांची घेतली आहे. तर,...