Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट दहा दिवसानंतर एलॉन मस्क पुन्हा ट्विटरवर सक्रिय; शेअर केले 'हे' ट्वीट्स

दहा दिवसानंतर एलॉन मस्क पुन्हा ट्विटरवर सक्रिय; शेअर केले ‘हे’ ट्वीट्स


Elon Musk on Twitter : टेस्ला कंपनीचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क यांचे ट्वीट्स हे अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. पण 21 जूननंतर एलॉन यांनी ट्विटरवर एकही ट्वीट शेअर केले नव्हते.  ट्विटरवरील अनुपस्थितीचे कारण एलॉन यांनी अजून नेटकऱ्यांना सांगितले नाही मात्र आता एलॉन हे दहा दिवसांनंतर आज ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी दहा दिवसांनंतर काही ट्वीट्स शेअर केले आहे. पाहूयात एलॉन यांचे ट्वीट्स…

एलॉन मस्क यांनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट

दहा दिवस ट्विटरवर अॅक्टिव्ह नसणाऱ्या एलॉन मस्क यांनी आज चार ट्वीट्स शेअर केले आहेत. त्यामधील एका ट्वीटमध्ये त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. ‘काल पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची संधी मिळाली.’ असं कॅप्शन एलॉन यांनी फोटोला दिले. यामध्ये एलॉन यांच्यासोबत त्यांची चार मुले दिसत आहे.  

यूट्यूबर Technoblade ला एलॉन यांनी वाहिली श्रद्धांजली

दुसऱ्या ट्वीटमध्ये एलॉन यांनी प्रसिद्ध यूट्यूबर Technoblade ला श्रद्धांजली वाहिली. Technoblade चे काल(1 जून)  वयाच्या 23 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. Technoblade चे मूळ नाव  अॅलेक्स होते. त्याचे YouTube वर जवळपास 12 मिलियन फॉलोअर्स होते.

‘Feeling … perhaps … a little bored?’ असंही ट्वीट एलॉन यांनी आज ट्वीटरवर शेअर केलं आहे. 

‘व्हेनिस, महान स्मरणस्थळ’, असं कॅप्शन देऊन एलॉननं एक फोटो देखील शेअर केला. 

याआधी एलॉन हे  जून 2020 मध्ये काही दिवस ट्विटरवर अॅक्टिव्ह नव्हते. त्यावेळी मुलाच्या जन्मानंतर  ‘काही वेळेसाठी ट्विटर ऑफ करत आहे.’, असं ट्वीट करुन एलॉन यांनी त्यांच्या ट्विटर ब्रेकबाबत सांगितलं. त्यानंतर चार दिवसांनी एलॉन हे ट्विटरवर अॅक्टिव्ह झाले होते. 2019 मध्ये देखील एलॉन यांनी तीन दिवस ट्विटर अकाऊंटवर कोणतेही ट्वीट शेअर केले नव्हते. यावेळी ट्विटरवरुन एवढे दिवस लांब राहण्याचे कारण मात्र एलॉन यांनी नेटकऱ्यांना सांगितलं नाही. 

हेही वाचा :

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दह #दवसनतर #एलन #मसक #पनह #टवटरवर #सकरय #शअर #कल #ह #टवटस

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, आता ‘या’ देशात आश्रय

Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेतून पलायन करत सिंगापूरमध्ये...

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

गर्भातील बाळाची पोझिशन कशी ओळखाल? त्याचा प्रसूतीवर परिणाम होतो का?

Know Baby Position : बेबी मॅपिंग म्हणजे काय? हे आधी आपण जाणून घेऊया. गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत बाळाची पोझिशन जाणून घेण्यासाठी बेली मॅपिंग केलं...